पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२४ बृहद्योगवासिष्ठसार. उत्पन्न होतो त्याप्रमाणे प्रलय व निद्रा-समयी भज्ञानाच्या योगाने आच्छादित झाल्यामुळे भात्म्याला आपलें निरतिशय आनंदस्वरूप दिसेनासे झाले असतां काम-कर्म-वासनापरिपाक-क्रमाने प्राप्त झालेल्या सर्ग-जागरादि काली सहज चिद्विलासाच्या योगानेच सूक्ष्म-स्थूल समष्टि व्यष्टि शरीर उत्पन्न होते. त्या देहद्वयाच्या योगाने त्यांच्या ठायीं अहंभावाध्यास होतो व त्यापासून ही राग-लोभ-मोहादि अनर्थरूप मिथ्या मायामदशक्ति उद्भवते. तिच्यामुळेच हे सर्व झाले आहे. आत्माच मन, बुद्धि, अहंकार, वासना, इंद्रियें इत्यादि नामरूपानी स्फुरत असतो. चित्त व अहंकार याचे द्वित्व वचनमात्र ( शब्दमात्र) आहे. वस्तुतः नाही. जे चित्त तोच अहकार व जो अहकार तेच मन (चित्त) होय. बोपेक्षा त्याची शुभ्रता निराळी आहे अशी व्यर्थ कल्पना करीत असतात की नाही ! तसाच चित्त व अहंकार याचा भेद व्यर्थ आहे. पाढरे वस्त्र जळले असता वस्त्र व त्याचें शुभ्रत्व ही दोन्ही जशी नाहीशी होतात. याप्रमाणे यातील कोणी तरी एक क्षीण झाले की दोन्ही नाहीशी होतात. तुन्छ मोक्षबद्धि, बधबुद्धि व इच्छा याचा त्याग करून पैराग्य व विवेक याच्या योगाने केवल मनाचा क्षय करावा. मला मोक्ष प्राप्त व्हावा, अशी चिंता जरी भात उत्पन्न झाली तरी मन उत्पन्न होते. ते मनन करू लागले की शरीराकार होते. व त्याच्या द्वारा बाह्य प्रवृत्ति होऊन दोष उद्भपतो. यास्तव मनन निर्मूल कर. वायु, वृक्षाप्रमाणेच, देह व त्याचे अवयव याना हालवितो. पण सर्वव्यापी, सूक्ष्म व अचल चित्-ला हालवू शकत नाही. मेरूप्रमाणे स्थिर असलेली चित् स्वतःही हालत नाही. जिच्यामध्ये सर्व अर्थ प्रति- बिंबित झाले आहेत अशी केवल स्वात्म्यामध्येच स्थित असलेली ती चित् दीपाप्रमाणे आपल्या बोधप्रकाशाने जगास प्रकाशित करते. तेव्हां हा मी. हे माझे, इत्यादिकास अवकाश कोठे आहे ? ज्ञातृत्व, कर्तृत्व, भोक्तत्व व असेच दुसरेही आरोपित भाव मृगजगासारखे मिथ्या आहेत. हा सर्व अविद्येचा खेळ आहे. ही अज्ञताच मनोरूपी मत्त पशस ओढून नेते. ती वस्तुतः असत्य असूनही सत्य आहे, असा भ्रम होतो. पण तिचे यथार्थ स्वरूप कळलें म्हणजे ब्राह्मणामथे जशी चाडाळकन्या उभी राहत नाही त्याप्रमाणे ती विद्वानामध्ये क्षणभरही रहात नाही. तर पळून जाते. रामा, परमार्थ ज्ञानाच्या योगाने वासनाही सळून नष्ट होते. भविद्या