पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरणं-सर्ग १३. ८१ कोणती हानि आहे ? नसलेच तर तसा निर्णय होईल; व पुनः मनास रुखरुख रहाणार नाही, आणि असले तर त्याच्या विषयींचा सशय जाऊन चित्त स्थिर होईल; ससार क्षीण होईल व विचार न करितां, नास्तिकपणामुळे त्याचा अव्हेर केला, असे होणार नाही. पण या संसार- दुःखातून मुक्त होण्यास कोणता उत्तम उपाय आहे बरें ? असें म्हणून जेव्हां एकादा पुण्यवान् पुरुष त्याचा विचारच करू लागतो तेव्हा थोड्याच कालात त्याचे सर्व सशय नाहीसे होऊन तो मोक्षास पात्र होतो. शुद्ध- आत्मभावासारखें स्वास्थ्य दुसऱ्या कशातही नाही. धन, मित्र, बाधव, नमस्कारादि-रूपाने हातापायाची चेष्टा, यात्राप्रसगाने दशांतरगमन, उप- वासादिकाच्या योगाने शरीरास क्लेश देऊन बल, उत्साह, निद्रा इत्यादि- काचा क्षय, क्षेत्रनिवास इत्यादिकातील एकाही उपायानें तें स्वास्थ्य प्राप्त होत नाही. तर केवल श्रवणादि प्रयत्नाने साध्य होणारे जे मनाचे ऐकाम्य व त्यामुळे होणारा जो दृढ आत्मसाक्षात्कार त्याच्या योगाने ते साध्य आहे. एकातात सुखकारक आसनावर बसून विचार करू लागले की असभा- वना, असद्भावना, विपरीत-भावना इत्यादि दोषाचा क्षय होतो; चित्तवृत्ति ब्रह्माकार होते, अविद्येचा व विक्षेपादिकाचा नाश होतो व ते निरायास पद प्राप्त होते. ते स्थान म्हणजे सर्व असार सुखाची सीमा आहे. या- स्तव अगोदर मनास जिंकण्याचा प्रयत्न करावा. शम व सतोष याचे तेच साधन आहे. मनोजयामुळे अनंताशी दृढ तादात्म्य होते. हाच आनंद देणारा योग होय. त्या अवस्थेतील सौख्य अवर्णनीय आहे. शमाच्या योगाने कल्याण होते; शम हेच परम पद आहे, शम हाच शिव आहे; शम हीच शाति आहे व शम हेच भ्रातिनिवारण आहे. जे शमाच्या योगाने तृप्त झाले आहेत, ज्याचा अतरात्मा शीतल झाला आहे व ज्याचें चित्त शमाने भूषित झाले आहे त्याचे शत्रुही मित्र होतात. शमाच्या योगाने चित्त आते शुद्ध होते. शमाची शोभा मुखकमलावर चमकू लागते. अहो, या शमाच्या ऐश्वर्यापुढे त्रैलोक्यातील ऐश्वर्य तुन्छ आहे. शातचित्त पुरुषास दुःख होत नाही; तृष्णा व्याकुळ करीत नाहीत व मानसिक व्यथा पीडा देत नाहीत. शमाच्या योगाने शोभणाऱ्या परुषावर सर्व प्राण्याचा विश्वास बसतो. शात चित्तात जे सुख होतें तें अमृतपानातही नाही. यास्तव, बा साधो, तृष्णारहित चित्तास शमा-