Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७४. सर्वगामी असला तरी पाषाणात व्यक्त होत नाही. तर पुर्यष्टकांत मात्र व्यक्त होतो. ज्याप्रमाणे सूर्य आकाशात असला म्हणजे लोकाना व्यवहारं करण्याची इच्छा होते त्याप्रमाणे पुर्यष्टकात हा परम प्रेमास्पद आत्मा असला तर विचित्र भोगेच्छा उद्भवते. तेव्हां नित्य सत्तारूप आत्मा असताना देह जर नाश पावत असेल तर तो नष्ट होईना. आत्मा कधी उत्पन्न होत नाही, मरत नाही, कधी काही घेत नाही, इच्छीत नाही व तो मुक्त माही आणि बद्धही नाही. पण त्याच्या या स्वरूपाचे विस्मरण झाले की अनर्थभ्राति होते. तो अनादि असल्यामुळे उत्पन्न होत नाही उत्पन्नच न झाल्याकारणाने मरत नाही आणि तो असा आहे हे कळले म्हणजे आत्मातिरिक्त वस्तूचा असंभवच झाल्यामुळे कशाची इच्छा करीत नाही. दिशा, काल इत्यादिकाच्या योगाने मर्यादित न झाल्यामुळे हा कधीही बद्ध नाही. बधाभावी मुक्ति कोठची? त्यामुळे अमो- क्षच स्थित झाला, साराश हे राधवा, सर्वांचा आत्मा एवगुणविशिष्ट आहे. पण केवळ अविचारवशात् हे मूढ जन रडत असतात. तुला आता पूर्वापर जगरकर कळला आहे. यास्तव तूं तरी त्याच्याप्रमाणे दुःखी होऊ नकोस. बं. मोक्षरूप भ्रम सोडून तुझ्या सारख्या विद्वानाने कळसूत्री यत्राप्रमाणे व्यव- हार करावा. मोक्ष काही कोठे आकाशात, पाताळात किंवा भूपृष्ठावर राहिलेला नाही. तर यथार्थ ज्ञानयुक्त विमल चित्त हाच मोक्ष होय. कोण- त्याही आशेमध्ये ससक्त न होता चित्ताचा आपोआप क्षय होणे यालाच तत्त्वज्ञ मोक्ष म्हणतात. जोवर विमल बोध उत्पन्न झालेला नाही तोवरच प्राणी मूर्खपणामुळे दीन होऊन भक्तीने मोक्षाची इच्छा करतो. पर बोध प्राप्त होऊन चित्त चित्-तत्वतेस प्राप्त झाले म्हणजे मग एकचसा काय पण दहा मोक्षही कोणी इच्छिगार नाही. यास्तव या सर्व कल्पना सोडून तुं महात्यागी हो व निःसंगमनाने वशपरपरेनें प्राप्त झालेल्या पृथ्वीचे पालन कर ७३. __ सर्ग ७४-प्रमादामुळे संसारभ्राति, प्रबोधामुळे पूर्णता व जीवन्मुक्तगुण याचें वर्णन. श्रीवसिष्ठ-ज्याप्रमाणे रम्य काता-पुत्रादिकांचे मुख दृष्टी न पडल्या- मुळे विरही पुरुषाच्या चित्तांत म्लानता, कृशता इत्यादि देणारा उद्वेग