पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२२ बृहद्योगवासिष्ठसार. असून एक आत्माच सत्य आहे, अशी भावना कर म्हणजे हे महात्मन् , तूं संसारातीत होशील ७२. सर्ग ७३-तिन्ही अहंभाव सोडले झणजे मुक्ति व वैराग्य हस्तगत होते. श्रीवसिष्ठ-रामा, असा विचार केला असता द्वैतत्यागाने स्वरूपाव- स्थिति प्राप्त होते. आता आणखी एक दृष्टि सांगतो, ती ऐक. म्हणजे तुं अचल व दिव्यदृष्टि होशील. मी आकाश आहे, वायु आहे, सूर्य भाहे, मीच दैत्य, मीच देवलोक, दिवस, रात्र, तम, अभ्रे, भूमि, समुद्रादिक, रज, वाय, अग्नि व सर्व जगत् आहे. त्रिभुवनात मीच भात्मा सर्वत्र स्थित आहे. मी कोण, देहादि हे सर्व काय आहे ? एकाला द्वित्व कसे आले इन्यादिकाचा विचार करून जगाला आत्मरूपाने पहाणारा ज्ञानी हर्षविषा- दपरवश होत नाही. सर्व जर आत्ममय आहे तर या जगात आपलें काय व दुसऱ्याचे काय ? रामा सात्त्विक, निर्मल, तत्त्वज्ञानापासून प्रवृत्त होणान्या, पारमार्थिक व मोक्षद दोन अहंकारदृष्टी आहेत. एक मी सर्वांहून निराळा व अति सूक्ष्म आहे ही व दुसरी सवे मीच आहे ही. याहून निराळी आणखी एक अहंदृष्टि आहे. ती 'मी देह आहे ' असे समजणे ही होय. पण ती शातीच्या उपयोगी नसून दुःख देणारी आहे. यातील पहिल्या दोन दृष्टी शुभ असून तिसरी जरी अशुभ आहे तरी सर्वोत्तम मिद्धीकरिता अगोदर तिसरी व मागून पहिल्या दोन दृष्टी सोडाव्यात. आत्म जरी सर्वातीत व सर्वसत्तातिगामी असला तरी तो सर्वप्रकाशक आहेच. तूं आपल्या अनुभवानेच पहा. तू तोच सदा उदित परमात्मा आहेस. हे तत्त्वज्ञा, तू आशयासह हृदयग्रथि सोड. आत्मा अनुमान, शब्द इत्यादि प्रमाणानी गम्य नाही. तो सर्वदा सर्वथा स्वानुभवानेच प्रयक्ष आहे. तो सत् , असत्, अणु, महत् इत्यादि काही नाही. सदसत् इत्यादि रूपही नाही. तोच बोलतो, पण त्याच्याविषयी बोलता येत नाही. हा आत्मा व हा अनात्मा या भिन्न सज्ञाही त्यानेच आपल्या स्वरूपांत सर्वगत शक्तीने कल्पिल्या आहेत. तो भास्वर त्रिकाली सर्वत्र स्थित आहे, पण अतिसूक्ष्म व अति महान् असल्यामुळेच केवल दिसत नाही. तोच स्वतः पुर्यष्टकांत प्रति- विषित होऊन जीवभावास प्राप्त होतो व स्वाभाविकपणेच स्वभावास विस- रून बाघदृष्टि बनतो. पुर्यटकाचा उदय झाला म्हणजे मगच भात्म्याचा साक्षात् अनुभव येऊ लागतो. सर्व पदार्थाच्या सचेप्रमाणेच हा महेश्वर