पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ९ . आत्मा नष्ट होत नाही. विनाशी देह नष्ट होऊन, आपली स्वाभाविक स्थिति प्राप्त झाली असता मी नाश पावतों, असें मानुन ज्याचे मन खिन्न होते त्या मूर्खास धिक्कार असो.-देह व आत्मा यांचा जर वास्तविक संबंध नाही तर शाखांच्या कंपाने वृक्ष जसा कंपायमान होतो त्याप्रमाणे देहाच्या प्रवृत्तीने आत्मा ससारी कसा होतो ?- म्हणून विचारशील तर सागतो. अश्वादिकास बाधलेल्या दोऱ्या व रथ याचा संबंध प्रीति-योग्यता व द्वेषयोग्यता यानी जसा रहित असतो तसाच देह, चित्त, इद्रिये इत्यादिकाशी चैतन्याचा संबंध स्नेह- उद्वेगशून्य असतो. सरोवरातील चिखल व निर्मल जल याच्या संबंधा- प्रमाणेच देह-इंद्रिये व आत्मा याचा संबंध परस्परप्रेमशून्य आहे. कल्पित वेताळाच्या-विक्राळ तोंड, दाढा-इत्यादिकान्या योगाने वाटणा-या भीतीप्रमाणे स्नेह-सुखादि मिथ्या आहेत एकाच झाडाच्या लाकडापासून केलेल्या नाना- प्रकारच्या बाहुल्याप्रमाणे भूतपंचकापासून झालेली शरीरे अगदी निर- निराळ्या आकाराची असतात. काप्टभारात काष्ठावाचून जसे दुसरे काही नाही त्याप्रमाणे भूतापासून झालेल्या शरीरापिंडात भूतावाचून दुसरे काही नाही तेव्हा अहो लोकानो, पचभूताचा क्षोभ, नाश उत्पत्ति इत्यादि प्रसंगी हर्ष, क्रोध व विषाद याच्या वश का होता ? स्वदेहाप्रमाणेच स्त्री- पुत्रादिकाच्या देहावरही आस्था ठेवणे सर्वथा अनुचित आहे. कारण त्याच्या रचनेत जरी काही फरक असला तरी शरीरद्रव्यात काही अंतर नसल्या मुळे अज्ञाप्रमाणेच प्राज्ञानी नुसत्या बाह्य आकारावर भुलन जाणे योग्य नव्हे. दोन चार दगडी, लाकडी किंवा चिरगुटाच्या बाहुल्या एकत्र केल्या असता त्याचा जसा परस्पर स्नेह बसत नाही त्याप्रमाणे पचभूताच्या योगाने बनलेल्या अनेक शरीराचा संयोग झाला तरी ज्ञानी प्रेमपाशबद्ध होत नाही. मातीच्या बाहुलींचा समागम झाला असता त्याचा जसा आशय असतो तसाच बुद्धि, इद्रियें, आत्मा व मन याच्या सगमप्रसगी तुझा असू दे. कारण बाहुल्याप्रमाणेच देहादिकही प्रेमपात्रे नाहीत. मग त्याविषयी शोक कसला! तरंग तृणाला जसे एकत्र करितात त्याप्रमाणे देहदृष्टि भूताना (प्र ण्याना) एकत्र करते. जलांमध्ये संयुक्त होऊन वियुक्त होणान्या तृणाप्रमाणे प्राण्याचा सयोग व वियोग होत असतो. पण 'ही माझी व मी यांचा ही अंत:कल्पना सोडली की, मग दृष्टातातील तृणाप्रमाणेच दुःख होत