पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७२ कारण नाही. झाडाच्या पानाचा रस सुकला म्हणून तो काही नाश पावत नाही. तर सूर्याच्या किरणामध्ये जाऊन रहातो. त्याप्रमाणे शरीर क्षीण शालें तरी कोणाचाही देही क्षीण होत नाही. तर तो वासनाशून्य असल्यास मात्मपदी रहातो व वासनावान् असल्यास मातेच्या योनीत शिरून तिच्या शेोणिताने पुनः शरीरवान् होऊ लागतो. जीवाचाही आत्यतिक नाश होतो; नाही असे नाही. पण तो केव्हा ! शरीराच्या नाशाबरोबर नन्हे. चिचाचा नाश झाला म्हणजे मग होतो आणि तोच मोक्ष होय. यास्तव शरीर मेले असता जीव मेला, नष्ट झाला, असें जें म्हणतात ते मिथ्या आहे. कारण एक देश व काल यास सोडून तो वारंवार अन्य अन्य देशादिकामध्ये सशरीर होऊन अनुभवास येतो याप्रमाणे या ससारनदीमध्ये तरंगाबरोबर वहात जाणाऱ्या तृणतुल्य जीवाकडून मेला, झाला, वाढला, सुखी, दुःखी इत्यादि भ्रातिकल्पना केल्या जातात. वानर जमा एका झाडावरून दुसन्या झाडावर पटकन उडी मारून जातो त्याप्रमाणे वास- नावान जीव एका शरीरास सोडून दुसऱ्या शरीरात अकस्मात् शिरतो. पुनः ते सोडून तिसऱ्यात प्रवेश करतो. याप्रमाणे आपल्याच वासनेकडून जीव, बालकास फिरविणान्या धूर्त धात्रीप्रमाणे, इतस्ततः फिरविले जातात. वासनारज्जूने बाधून सोडलेले व जीवावरच उपजीविका करणारे जीर्ण जीव आपले आयुष्य मोठ्या दुःखाने घालवीत असतात. ते वासनानु- वृत्तीने अतिशय जीर्ण होऊन दारिद्य, रोग, वियोग इत्यादिकाच्या दुःख- भाराखाली चिरडून जातात व शेवटी नरकात पडतात. वाल्मीकि--वसिष्ठ मुनि इतके सागत आहेत तों सायंकाळ झाला. सामुळे सध्योपासनादि करण्याकरिता सवे सभासद स्वस्थानी गेले व दुसन्या दिवशी योग्यसमयीं आपापली नित्य कर्मे आटोपून सभेत येऊन यसले ७१. येथे तेरावा दिवस समाप्त झाला. सर्ग ७२-शरीर भौतिक असल्यामुळे त्याविषयीं शोक करणे व्यर्थ आहे. दृश्यदर्शनसंबंध व शुद्धसाक्षी याचे वर्णन. श्रीवसिष्ठ-रामा, देह तुझा कोणी नव्हे. तूं निष्कलंक आत्मा आहेस. यास्तव देहसंबंधी जन्ममरणाशी तुझा काही संसर्ग नाही. भाज्यांतील बोरे गेली तरी भांडे नाहीसे होत नाही व भाडे फुटलें तरी बोरे माहीशी होत नाहीत. त्याचप्रमाणे देह व भात्मा यांतील एक ( देह) गेला तरी