पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१८ बृद्योगवासिष्ठसार. आत्मा चित्तामध्येच मात्र व्यक्त होतो. भूतलावरील सखल भूमि हे जसे जलाचे आस्पद (स्थान) त्याप्रमाणे अतःकरण हे आत्मसंविदांचें स्थान. अतःकरणात बिबलेलें आत्मज्ञान व्यावहारिक व प्रातिमासिक जगपास व्यक्त करते. अंतःकरणच संसाराचे कारण आहे. यास्तव जीव, अंतःकरण चित्त, मन इत्यादि नांवानी ज्याचा व्यवहार करता येतो त्या सर्व-ससार-कारणाचाच स्वतः विचार करावा. श्रीराम-पण भगवन् , चित्ताला ही ना का प्राप्त झाली ? श्रीवसिष्ठ-रामा, हे सर्व पदार्थ म्हणजे सतत आत्मरूप चित्तापासून निघणारे तरगच आहेत. त्यात आत्मा स्फुरणरूपाने कोठे कोठे रहातो. पुष्कळ जागी तर तो महेश्वर अस्पंदरूपानेच असतो. पाषाणादि स्थावर जीव स्पदशून्य असतात व मानवादि जगम प्राणी सुरे( मद्या) वरील फेसाप्रमाणे सरद असतात. सर्व शरीरातील सर्व शक्तींचे बीज आत्मा आहे. स्वकल्पित अज्ञानामुळे तो स्वतःच प्रलय व सुषुप्ति-काली अज्ञान होऊन रहातो. ते अज्ञान प्रतिबिंबभावास प्राप्त होऊन अनत आत्मरूपाने भूषित झाले झणजे त्यालाच जीव असे ह्मण लागतात. तोच या ससा. रात महामोहरूपी माया-पिजन्यातील हत्ती आहे प्राण धारण करणे यालाच जीवन म्हणतात. या जीवनामुळेच तो जीव या संज्ञेस प्राप्त होतो. अह असा अभिमान त्याला प्रथम झाला. त्यामुळे त्याचे अहं हे नाव रूढ झाले. निश्चय करणे या सामर्थ्यामुळे तो बुद्धिसज्ञक झाला. सकल्पामुळे मन हे नाव त्याला पडले. प्रकृतिरूपाने प्रकृति हे त्याचे नांव रूढ झालें रक्त, मास, अस्थि इत्यादिकाच्या योगाने पुष्ट झालेल्या त्यालाच देह म्हणतात, तो अज्ञानाश-प्राधान्यान जड व चित्प्राधान्याने चेतन आहे. जड अज्ञान व अजड साक्षि याच्या अनराळी अमणार साभास मनच नानात्गस प्राप्त होऊन जीव, बुद्धि, मन, चित्त, अहकार इत्यादि नाना नावे धारण करतें जीवाचे हे स्वरूप बृहदारण्यकादि भनेक वेदान्त-भागामध्ये बहुत प्रकारें वर्णिले आहे. अज्ञ व तार्किक यांनी या संज्ञांमध्ये व्यर्थ व स्वतःच्या मोहाकरिताच आस्था ठेविली आहे. हे महाबाहो, याप्रमाणे जीव संसाराचे कारण आहे. क्षुद्र, जड व दीन देहाने काही केले नाही. भाधार व आधेय यातील एकाचा नाश शाला असता त्याबरोबर दुसन्याचाही नाश होईल, असे समजण्याचे काही