पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७१. ८१७ संबंध कसा होणार !-आत्माचा देहाशी जर संबंध नाही तर त्याची हालचाल व पुष्टि कशी अनुभवास येते ? मृत शरीरांत यांतील काही दिसत नाही !-म्हणून म्हणशील तर सागों. प्राणवायूच्या योगानें तो हालचाल (स्पद ) करतो व अन्नादि भूताच्या योगाने पुष्ट होतो. तात्पर्य द्वैत सत्य आहे, असे मानल्यावरही जर देह व आत्मा योध्या संबधाची उपपत्ति लागत नाही तर ते असत्य आहे, असे मान. ल्यावर ती कशी लागणार ? यास्तव द्वैतभ्रम सोडून अद्वितीय चिन्मात्रा- मध्येच स्थिति कर त्यात बध-मोक्षादिकाची शकाच नाही. रामा, सर्व सबाह्याभ्यतर शात आत्मामय आहे हा स्पष्ट प्रत्यय दृढ कर. मी सुखी, दुःखी, मूढ आहे या कुदृष्टी आहेत. त्याना जर तू सत्य मानू लागलास तर दीर्घ दःखाचीच इच्छा करीत आहेस, असें मी समजन. पर्वत व तृग यातील पर्वत स्थिर व मोठा असल्यामुळे त्याच्या विषयींची दृष्टि सुकर व तृण कोमल व चल असल्यामुळे त्याच्याविषयींची दृष्टि दुष्कर आहे. अथवा त्वचेला मृदु लागणारा रेशमाचा स्पर्श ग्राह्य व कठोर लागणारा पाषाणस्पर्श त्याज्य असतो त्याप्रमाणे अमर्याद, स्वप्रकाश व आनदरूप परमात्म्याची दृष्टि सकर व ग्राह्य आणि तुच्छ, अस्थिर व मन-आदि- कांची अपेक्षा करणारी देहाद्यनात्मदृष्टि दुष्कर व त्याज्य होय. तेज व अधकार याचा परस्पर विरोध असल्यामुळे, त्याच्या संबंधाप्रमाणेच साम्यही जसें नाहीं त्याचप्रमाणे अत्यत भिन्न असलेल्या देहात्म्याचे साम्य नाही. प्राण वायून्या योगानें देहाच्या सर्व क्रिया होतात. वेळूच्या भोकातून वाऱ्यामुळे जसा धनि निघतो तसाच तो याच्या मुग्व व नासिका या छिद्रातून निघतो नेत्राची उघडझाप वायूच्या योगानेच होते. इतर इद्रियाच्या क्रियाही व यून्या अधीन आहेत. ज्ञान हेच एक आत्म्याचे कार्य आहे. पण ते ज्ञान ( भात्मसवित् ) सर्वगत जरी असले तरी प्रतिबिंब जसें आरशासारख्या स्वच्छ पदार्थामध्येच पडते त्याप्रमाणे ते (आत्मसावित् , ज्ञान ) चित्तवृत्तीमध्येच अभिव्यक्त होते. शरीर- रूपी घरट्यास सोडून चित्तपक्षी आपल्या वासनावशात् जेथे जातो तेथे त्याचा अनुभव येतो. पुष्प असेल तेथेंच जसें गधज्ञान होते त्याप्रमाणे चित्त असेल तेथेच आत्मज्ञान स्फुरतें. सर्वव्यापी आकाश आरसा, जल इत्यादि काही योग्य पदार्थातच जसें प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे सर्वगामी ५२