पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. धुद झालेला तो तुर्यतेस प्राप्त होतो. यास्तव हे रघूढहा, तत्त्वज्ञ तुर्यातीत पदास जसे प्राप्त होतात तूं तसाच ही अगोदर निद्वपदास जाऊन पोच. निद्रित असल्याप्रमाणे व्यवहार करू लाग. म्हणजे चित्रांतील चंद्राप्रमाणे तुला हर्षशोक होणार नाहीत. (शास्त्रीय व्यवहाराच्या निर्वा- हार्य प्रथम पाचव्या ज्ञानभूमीचा अभ्यास करावा, असा याचा भावार्थ.) देहाचा क्षय किंवा वृद्धि झाल्यास चित्चाही क्षय अथवा वृद्धि होते, असें समजू नकोस. त्याच्या लाभ-हानीने तुझा लाभ किवा हानि काही नाही. देहाला पाहिजे त्या अवस्थेत राहू दे. तूं आपला आत्मबोध स्थिर व्हावा ह्मणून प्रयत्न कर, म्हणजे झाले. ते सत्य तुला कळले आहे. त्या पदाचें ज्ञान तुला झाले आहे व त्या आपल्या रूपास तूं प्राप्त झाला आहेस. यास्तव आता शोकरहित हो. इष्टानिष्टाचा त्याग करून तू आता स्वच्छ भाकाशाप्रमाणे शोभत आहेस. तुझें मन आता आत्मा झाले आहे. तें अधोभागी धावत नाही. तर योग-मत्र-तपःसिद्ध पुरुषाप्रमाणे ते उत्तरोत्तर ऊर्धभागी जात असते. या त्रिभुवनात शुद्ध चितच असल्यामुळे हा मी असा भ्रांत संकल्प करू नकोस. त्या विभूला आत्मा हे नावही केवल व्यव- हाराकरिता कल्पिलें आहे. नामरूपादि भेद त्याच्यापासून फार दूर रहातो. जलच सागर आहे व तरगादिकही त्याच्याहून पृथक् नाहीत. त्याप्रमाणे मात्माच हे सर्व आहे व पृथ्वी, जल इत्यादिकही त्याच्याहून पृथक् नाही. समुद्रांत पूर्ण जलावाचून काही नाही. तसेच जगात आत्म्यावाचून दुसर काही नाही. मग द्वित्वकल्पना कोठे व कशी रहाणार ? द्वैताचा स्वीकार केला तरी विद्यमान देहादिकाशी विभूचा संबंध होत नाही. कारण छाया व ऊन किंवा अधकार व प्रकाश याच्या संबंधाप्रमाणेच देह व देही याचा संयोग-संबध संभवत नाही. परस्पर विरोधी असलेल्ग शीतोष्णाप्रमाणेच देह व आत्मा याचा तादात्म्य संबंधही शक्य नाही. गुण व गुणी इत्यादि अयुतसिद्ध पदार्थीप्रमाणे जड व चेतन (देह व देही) यांचा समवाय- संबंधही शक्य नाही. चिन्मात्र आत्म्याचा देहसंबध ही कथा दावामींतील समुद्राच्या कथेप्रमाणेच दुरवबोध आहे. बरे त्यांचा भारोपित संबंध आहे, म्हणून म्हणावे तर देहात्मसंबंधाध्यासाचे अधिष्ठान आत्मा असल्यामुळे मात्मदर्शनानेच त्याचा बाध होईल. चिदात्मा निर्मल, नित्य, खप्रकाश च निरुपद्रव आहे आणि देह अनित्य व मलिन बाहे. तेव्हा त्यांचा