पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७१. त्याचा गळा कापतो व त्याविषयी अभिमान धरून हृष्ट होतो, हे प्रसिद्धच माहे. यास्तव राघवा, तूं संकल्प न सोडता नुस्ते शरीरचेष्टारूपी कर्म जरी सोडलेस तरी अकर्ता होणार नाहीस. याचा विचार करून तुला जसे करावेसें वाटेल तसे कर, बालकाच्या व्यर्थ लीलप्रमाणे फलाशारहित कर्मे करणे चांगलें. कारण त्यामुळे चित्त वासनाशून्य होते. पर्वत सर्व ऋतूंमध्ये जसा एकसारखा असतो (म्हणजे त्यावरील औषधि-वनस्पतींमध्ये ऋतुमानाप्रमाणे जरी फरक पडत असला तरी त्याच्या रचनेत काही अंतर पडत नाही) त्याप्रमाणे सुषुप्तस्थ महातेजस्वी ज्ञानी पूर्ण व सर्व अवस्थांमध्ये सम असतो. या सर्वोत्तम अवस्थेस प्राप्त झाल्यावर मग त्याने पाहिजे तर आपल्या शरी- राचा तत्काल त्याग करावा अथवा दीघेकाल सशरीर रहावे. काही केले तरी सारखेच. रामा, ही सुषुप्त-स्थिति अभ्यास योगानें-चांगली परिणात झाली असता तिलाच तत्वज्ञ तुर्या म्हणतात. कारण हिच्या अभ्यासाने तो ज्ञानी-महाशय आनंदमय, सर्व अंतःपीडाशून्य, व मनोभावरहित होत असतो. परमानंदांत मग्न झालेला तो महात्मा जगद्रचनेस तमाशा समजतो. आत्मवान् आपल्या पूर्णावस्थेपासून कधी च्युत होत नाही. डोंगरावर चढलेला जसा खालच्या दुर्बळाला हसतो त्याप्रमाणे पुण्य पदवीस प्राप्त झालेला तो जगद्रमाकडे पाहून हसत रहातो. तुर्यावस्थ पुरुष आनदमय झाल्यामुळे अनिर्वाच्य होतो, अनानंद, महानद व कलातीत अशा त्याला मुक्त, योगी व तुर्यातीत पदास प्राप्त झालेला असे म्हणतात. साराश हे रामा, असला महात्मा सर्व जन्मपाशरहित, व तमोमय अभिमानशन्य होतो आणि पाण्यात टाकलेल्या मिठाच्या खड्याप्रमाणे परम रसमयी सत्तेस प्राप्त होतो ७०. सर्ग ७१-परतत्त्व अनिर्वाच्य असल्यामुळे तुर्येचे वर्णन. शरीरादिकांचा निरास. श्रीवसिष्ठ-रघुनाथा, तुर्यावस्थेचा जोवर साक्षात् अनुभव येत असतो तोवरच केवलता-पद जीवन्मुक्ताचा व वाणीचा विषय होते. त्यानंतर वायूला जावयास योग्य असलेले भाकाश जसें मानवाचा विषय नव्हे त्याप्रमाणे विदेहमुक्त ज्यास प्राप्त होतात तें तुर्यातीत पदही विदेहमुक्त व वेदवचनें यांचा विषय होत नाही. सर्व दूर-दूरच्या पदार्थीहून दूर असलेली ती पदवी विश्रांतिमय भआहे. ज्ञानी पुरुष काही दिवस सुषुप्तावस्थेत असल्याप्रमाणे जगस्थितीचा अनुभव घेऊन त्यानंतर परमानंदाने