पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. सर्व पदार्थ अनित्य आहेत व दुःखरूप आहेत, असा निश्चय झाल्यावर विषयाविषयी मनन करण्याकडे किंवा त्याचे कौतुक करण्याकडे चित्ताची प्रवृत्ति होत नाही. आत्म्याच्या साक्षात्काराचे परम शांति व परम आनंद हे दृष्ट (प्रत्यक्ष ) फल आहे. यास्तव परुषाने यावज्जीव आत्याचे श्रवण करावें, मननाचा अभ्यास करावा; त्याचे निदिध्यासन करावे व त्याचा साक्षात्कार करून घ्यावा. शास्त्र, गुरु व आपला अनुभव याची एकवाक्यता होईतो जो श्रवणादिसाधनांचे सतत अनुष्ठान क- रितो त्यास दृढ आत्मदर्शन होते. आत्मज्ञ पुरुष कोणत्याही कष्टकर अवस्थेत जरी पडला तरी शास्त्राची अवहेलना करणाऱ्या व महाजनास तुच्छ मानणाऱ्या सुखी मूढाहून त्याची योग्यता कितीतरी श्रेष्ट असते. कारण आपल्या शरीरातील मुर्ख- पणापासून जितके क्लेश होतात तितके व्याधीपासून, विषामुळे किवा दुसऱ्या कोणत्याही आपत्तीच्या योगाने होत नाहीत. ज्याच्या चित्तास थोडासा तरी चागुलपणाचा सस्कार झालेला आहे, त्याच्या मूर्खतेस हे अध्यात्मशास्त्र नाहीसे करून सोडते यास्तव त्याचे आदाराने श्रवण करावे. हातात खापर घेऊन चाडालाच्या दारोदार भिक्षा मागत फिरणेही एकवेळ पतकरल ! पण मोख्ये पतकरणार नाही यास्तव राघवा,यातून सुटण्या- करिता माझ्यासारख्या आप्ताची सगति धमन स्वरूपास जाणून व जीवन्मुक्त होऊन जन्माचे सार्थक करून घ्यावे. या ससारयात्रेत दुखे अनत असून सुखाचा अगदी थोडा लेश आहे. यास्तव त्यात आसक्त होऊ नये. अनत व अनायास पद प्राप्त करून घ्यावे. ऐहिक विष- यात आसक्त झालेले अज्ञ घोर नरकात पडतात हे कधीही विसरू नये. विरक्त महात्मे सर्व जगास पूज्य होतात. विवेक, चैराग्य व अभ्यास याच्या योगाने या घोर ससारनदीचे उल्लघन करावे. या ससारात जो पुरुष आत्म्याविषयी निश्चित (बेपर्वा ) होता तो जळत्या घराच्या उच माडी- वर निजून रहातो, असे समजावे. अहो, ज्याची प्राप्ति झाली असता प्राणी या ससारात परत येत नाही व द.खी होत नाही ते पद केवल ज्ञानाच्या योगानेच लभ्य आहे. ते नाहीच असे मूर्खपणाने म्हणू नये. कारण ते जर नसते तर हे सर्व जड जग ज्ञानशून्य व त्यामुळेच .अधतुल्य झाले असते. शिवाय, जरी ते नसले तरी त्याचा नुस्ता विचार करण्यात