पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ७०. ४३ संगरूपी रंगाने शून्य आकाशात काढलेले हे जगन्मय चित्र सत्य नव्हे. पण त्याला सत्य मानून जे त्यांत आसक्त होतात ते दुःखपरंपरा भोगतात. भविद्येने पसरलेल्या भोगामध्ये आसक्त न झाल्यास, पाव- साळ्यांतील नद्यांप्रमाणे सर्व विभूती विस्तार पावतात. राघवा, आसक्त लोकांच्या शरीरांस जणुं काय आग लागलेली असते. पण तेच संगशन्य पुरुषाचे शरीर चंद्रबिंबाप्रमाणे शीतळ असते. असक्त मन सर्वत्र सुखालाच कारण होते. सारांश बा राजीव-लोचना, विद्यायुक्त, अविद्याशून्य व आसक्ति- रहित चित्ताने जो सदा रहातो तो मुक्त होय ६८. सर्ग ६९-.सर्व आसक्ति सोडून मनाला चिन्मात्र करावें. श्रीवसिष्ठ-सर्वदा विवेकाने सर्वांमध्ये स्थित असतांना व सर्व कमें करीत असताना आपल्या मनाला कोणत्याही चेष्टेमध्ये, चिंतेमध्ये किंवा वस्तूमध्ये आसक्त होऊ देऊ नये, आकाश, पाताळ, त्याच्या मधला प्रदेश, दिशा, उपदिशा, लता, आधिभौतिक पदार्थ, स्त्रीपुत्रादि बिषय, भोगरूप इंद्रिय वृत्ती, आध्यात्मिक पदार्थ, प्राण, मूर्धा, देहमध्य इत्यादि योगशास्त्रोक्त काम्य सिद्धीस अनकूल असलेली स्थानें, जामदादि अवस्था, कार्य-कारण, आदि- मध्य-अंत, दूर, समीप, नाम, रूप, जीव, शब्दादि विषय, मोह व आनंद वृत्ती, गमनागमनादि चेष्टा, इत्यादि कशामध्येही त्याला सक्त होऊ न देता केवल चैतन्यतंत्र करावे. अशा स्थितीस पोंचलेला जीव हा सर्व व्यवहार करो की न करो पण तो अजीव आहे. स्वात्म्यामध्ये रत झालेला जीव कर्म- फलाशी संबंध ठेवीत नाही. अथवा त्याने बुद्धिसाक्षित्वही सोडून शांत चिद्धन होऊन रहावे रामा, आत्म्यामध्ये तन्मय होऊन राहिलेला व त्यामुळे व्यवहारा- विषयी विरक्त झालेला पुरुष यदृच्छाप्राप्त व्यवहार जरी करीत असला तरी फलभागी होत नाही. तर तो मोठ्या दुःखाने देहभार कसा तरी वहात असतो ६९. सर्ग ७०-संग-सुखसंपन्न पुरुष व्यवहारजन्य दोषानी दुःखी होत नाही. श्रीवसिष्ठ-असंगसुखाचा अभ्यास करणारे उदार पुरुष व्यवहार जरी करीत असले तरी शोक-भयरहित रहातात. पुत्र-धननाश, बंधन, अपमान इत्यादिकच्या योगानें क्षुब्ध झाल्याप्रमाणे जरी ते दिसत असले तरी वस्तुतः भांतून क्षोभरहित असतात. त्यामुळेच परमार्थसुखाचा व त्यांच कधी वियोग होत नाही. त्याकारणाने त्यांची मुखश्री पूर्णचंद्राप्रमाणे दिसते.