पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार यांतील मी कशाची इच्छा करूं व त्याग कशाचा करूं ! असे वाटणे ही जीवन्मुक्तीस कारण होणारी असंगस्थिति आहे. अंतःसंगशून्य व त्यामुळेच मुक्तीस योग्य असलेला नर ' मी नाही व दुसराही कोणी नाही. सुखें होवोत किंवा न होवोत. ' असें म्हणत असतो. ज्या केवल आत्मतत्त्व- निष्ठ पुरुषाचे मन हर्ष व क्रोध यास वश होत नाही तो असंसक्त व जीवन्मुक्त होय. सर्व कर्मफलादिकास मनानेच जो सोडतो, कर्माने नव्हे, तो असंसक्त होय. अससगानें सर्वोत्तम फल प्राप्त होते. त्याच्या योगाने सर्व दश्चेष्टाची चागली चिकित्सा केल्यासारखी होते. सर्व विस्तीर्ण दुःखराशी संसक्तीमुळेच उत्पन्न होतात. गाढव पाठीवर भार वहातो, तो आसक्तीमुळे. वृक्ष शीत, उष्ण, वायु, वर्षाव इत्यादि सहन करीत एका किडे स्थानी स्थित असतात. पण तो आसक्तीचाच विकास होय. या आसक्तीमळेच पध्वी- च्या पाठीवर व उदरातही असह्य क्लेश सहन करीत असतात. मरणाला भ्यालेले पक्षी क्षुधेने ल्याकुळ झाले तरी वृक्षावरील आपली घरटी सोडून जात नाहीत; दूर्वांकुर व तृण भक्षण करणारी हरणे किराताच्या बाणानी मरून जातात; वारंवार मरून जन्म घेणारे हे अनेक लोक कृमि व कीट होतात; नद्याच्या लाटाप्रमाणे अनत भूर्ते पुनः पुनः उत्पन्न होऊन लीन होतात. जे मानव असतात ते लता व तृण होऊन वारंवार मरतात. सारांश सर्व अनर्थाचें कारण ससक्ति आहे. ती वंद्या व वंध्या अशी दोन प्रकारची आहे. तत्त्व- वेत्त्यांची ससक्ति वद्या व मूढाची संसक्ति वंध्या असते. आत्मबोधहीन, देहादिकास सत्य मानणारी व पुनर्जन्मास कारण होणारी संसक्ति वंध्या होय व याच्या उलट म्हणजे आत्मबोधयुक्त, अनात्म पदार्थास असत्य मानणारी व पुनर्जन्मशून्य संसक्ति वद्या आहे. या उत्तम संगामुळे ब्राह्म शरीर होते. या वंद्य संसक्तीच्या प्रभावानेच लोकपाल सर्व सिद्धिमान् होऊन जगत्-अगण्यांत स्थित आहेत. या दोन प्रकारच्या संसक्तीमुळेच जगातील सर्व इष्टानिष्ट भावाची स्थिति होत असते. ब्रह्माडरूपी उंबरामध्ये देव, दानव व मानव हे उंच-नीच किडे संसक्तीमुळेच कोंडून पडलेले असतात. प्राणी एकमेकांस या दुष्ट संगामुळेच मारतात, खातात, तोड- तात व छळतात. संसक्तीमुळेच, वृक्षांवरील मशकांप्रमाणे, आकाशात नक्षत्रगण सतत भ्रमण करतो. राघवा, केवल पासनावशात् आत्माकाशांत कोणी कुशल चिताऱ्याने हे विचित्र चित्र कसे काढले आहे पहा. मनः