पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६८. होतो, असें विद्वान् म्हणतात. नुस्त्या सांनिध्याने काही होत नाही. अंत:- मगामुळे सर्वप्रकारचा अनर्थ कोसळतो. पाने, पाणी, केर, काष्ठे यांचे सानिध्य होते, पण अंतःसंग नसल्यामुळे त्यास परस्पराविषयी दुःख होत नाही. अज्ञानामुळे आत्म्याने स्वरूपास विसरून देहावर अभिमान ठेवला की तो त्याच्या सुख-दुःखानी सुखी व दुःखी होतो. यास्तव अतःसंग हे सर्व अनर्थीचे कारण आहे. देहाभिमानी पुरुष संसारात मग्न होतो व सस- क्तिशून्य ज्ञानी त्यातून मुक्त होतो. अतःसगयुक्त चित्तच शतशाखांनी विस्तार पावलेले चित्त होय व सगशून्य चित्ताला विलीनचित्त म्हण- तात. फुटलेल्या स्फटिकाप्रमाणे भासक्तचित्त अपवित्र आहे व तेच असक्त झाल्यास परम पवित्र होते. निर्मल व असक्त चित्त संमार करीत असले तरी मुक्त होय. पण आसक्त चित्त दीर्घ तपाने युक्त असले तरी बद्ध असते. तस्मात् आसक्ति व अनासक्ति हेच बंधमोक्षाचें कारण आहे. चित्त आपल्याला कर्ता समजू लागले की, देहाचें कर्तृत्व त्याचे ठायी येते व मन मी कर्ता नाही, असे म्हणू लागले की तें देहामध्येच रहाते. शून्यचित्त पुरुष कर्म करीत असला तरी मी कर्ता आहे, असे त्याला वाटत नाही व त्यामुळे तो कर्ता नव्हे. यास्तव हे राघवा, चित्ताने जे केले ते तूंच केलेस व त्याने जें केलेले नाही ते तूं केलेले नाहीस. असक्त चित्त कर्मफलाचा भोग घेणारेही नव्हे. अससक्त पुरुष ब्रह्महत्या व अश्वमेध यांच्या पाप-पुण्यानी लिप्त होत नाही. अतःसंग- शून्य व मधुरवृत्तिमान् पुरुष बाहेर काही करीत असला तरी व नसला तरी कर्ता व भोक्ता नव्हे. यास्तव बा सच्छिष्या, हा दुष्ट व अनर्थवीजभूत अंतःसग सोड व परम सुखी हो ६७. सर्ग ६८-संग व असंग यांचे लक्षण, त्यांच्या चिकित्सेचा उपाय. श्रीराम-भगवन् , संग कसा असतो. तो मानवास बद्ध कसा करतो व तोच मोक्षोपयोगी कसा होतो ! श्रीवसिष्ठ–देह व देही ( देहवान् आत्मा ) यांचा जडचित्स्वभावरूप विभाग सोडून देहच आत्मा आहे असा विश्वास धरणे हाच बंधहेतु संग आहे. अनत आत्मतत्त्वाला विसरून त्याला परिच्छिन्न (मर्यादित ) समजण व या मूढ कल्पनेमुळे आत्मभिन्न विषयांपासून सुखाची इच्छा करणे हाच बंधाला कारण होणारा संग आहे. पण हे सर्व आत्माच आहे. तेव्हा