पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१० बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ याप्रमाणे संसाराच्या असारतेविषयी पुष्कळ विचार करून काही दिवसांनी ते दोघेही ज्ञानवान् झाले. एवढ्यासाठीच हे महाबाहो, संसारांतून तरून जाण्यास ज्ञानावाचून दुसरी गति नाही. संसाराचे दुःख जरी अनंत असले तरी गरुड जसा महासागरास लीलेने तरून जातो त्याप्रमाणे विचारवान् त्यातून पार पडतो. देहातीत झालेले महात्मे केवल चिन्मात्र आत्म्यामध्ये राहून प्रेक्षकाप्रमाणे दुरूनच देहास पाहतात. देह दुःखाने जरी अतिशय क्षुब्ध झाला तरी त्यांत आमची कोणती हानि आहे ? रथ तुटला किंवा फुटला तर त्यांत सारथ्याची कोणती हानि होणार ? मन क्षुब्ध झाले तर त्यात चित-तत्त्वाचे काय गेले ! जलाचे हंस कोण ? जल व पाषाण याचा काय संबंध? शिला व काष्ठे याचे काय नाते ! काही नाही. त्याच प्रमाणे भोग व परमात्मा यांचा काही सबंध नाही. पश्चिम समुद्र व पूर्व पर्वत याचा जसा काही सबध नाही त्याप्रमाणे परमात्मा व संसार यांचा काही संबंध नाही. पाण्यावर लाकुड किवा दगड टाकले असतां जसे शितोडे उडतात त्याप्रमाणे देह व आत्मा याच्या संबंधामुळे या सर्व चित्तवृत्ती उठतात. जल व काष्ठे यांचा संयोग झाला असतां जलांत जसें काष्टाचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे आत्म्यामध्ये शरीरें केवल सांनिध्यामुळे दिसतात. दर्पण, तरंग इत्यादिकातील प्रतिबि. वस्तुतः जशी सत्य अथवा असत्य ह्मणता येत नाहीत त्याप्रमाणेच अत्म्याच्या शरीराविषयी काही निश्चय करितां येत नाही. लाकुड, पाषाण इत्यादि जड वस्तूंच्या नाशादिकांप्रमाणेच देहाकार परिणाम पावलेल्या पंच भूतांच्या नाशादिकामुळे आत्म्याला दुःख होण्याचे काही कारण नाही. भासमान सुख-दुःखादि-अनुभव शुद्ध आत्म्याचे किंवा जड शरीराचे नव्हेत. तर अज्ञानाचे आहेत. यास्तव अज्ञान गेलें की शुद्ध चित् रहाते. अज्ञच या संसाराला सत्य समजत असतो. ज्ञानी कधी नाही. तो त्याला सदा असत्य समजतो. ज्ञानी अभिमानावाचूनच प्रारब्धप्राप्त भोगाचा अनुभव घेतो. सदा सर्वत्र शुद्ध चितूच जरी स्थित आहे तरी मनःसंकल्पामुळे ती मिथ्या सुख-दुःखानी लिप्त होते. मनोनिश्चयामुळे स्वप्नस्त्रीसगाप्रमाणे असबंधही संबंध होतो. संग सोडल्यास आत्मा देह-दुःखानी कधीही लिप्त होत नाही. मी देह आहे, या मिथ्या भावनेनेच आत्मा देह- दुःखाच्या वश होऊन राहिला आहे. यास्तव तिचा त्याग केल्याने तो मुक्त