पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १७. ८०९ होतांच पुनः तेथून अवशिष्ट पाप अथवा पुण्यमिश्रित पाप भोगण्याकरिता अधोलोकी यावे लागते. शिवाय स्वतः स्वगौतही हर्ष, क्रोध, असूया, काम इत्यादि अनेक दोषांचे प्राबल्य व शमादि साविक गुणांचा असंभव असल्यामुळे ज्ञान दुर्लभ होते. ज्ञानाभावी विषयलालसा उत्तरोचर वाढते व त्यामुळे जीव वारवार भोगलेल्या त्याच त्या विषयांचा भोग घेत व्यर्थ काल घालवितो. दैववशात् स्वर्गातून च्युत झाल्यावरही मानुष्य किंवा त्यांतही दुर्लभ असलेलें ब्राह्मण्य जरी प्राप्त झाले तरी भोग- लांपल्यामुळे पुनः तशाच भ्रमणात पडावे लागते. दुःखें अथवा सुखाभास यांच्या योगाने दीर्घ व अदीर्घ, अशुभ व शुभ झालेले दिवस व रात्री भराभर जातात. मिथ्याभूत कर्माच्या योगाने भायुष्य कसे तरी जात असते. ते कधी कोणत्याही कारणाने थाबत नाही. मनोरूपी मत्त हत्ती तृष्णारूपी हत्तिणीच्या मागून धावत असतो. शरीररूपी वृक्षाच्या चित्त- ढोलीत राहणारा अभिलापरूपी सातारा गृध्र आयुष्य व विवेकरूपी चिंता- मणी व्यर्थ घालवितो. भज्ञ पुरुषाची नीरस व निःसुख दिवस पक्ति पिकलेल्या पानाप्रमाणे भराभर गळत असते. वृद्धापकाळी मृत्य-पुत्रादि अपमान करूं लागले म्हणजे प्राण्याची मुखश्री म्लान होते. यौवन-कमल- रहित व शुष्क शरीररूपी सरोवरांतून आयुष्य-राजहंस पडून जातो. कालवायूर्ने जोराने हालविलेल्या व जजेर झालेल्या जीवित-वृक्षावरून भोगपुष्पें गळून खाली पडतात. मन मोहात गढून जाते. तृष्णा वाढते. जीविताशारूपी ततूला कलारूपी उंदीर तोडू लागतो. बा मित्रा, जन्मोजन्मी ही देहरत्नशलाका नाशरूपी चिखलात केव्हा बुडते ते काही कळत नाही. चिता-चक्रास बाधलेलें व कुकर्मे करणारे चित्त भोवन्यातील तृणा- प्रमाणे फिरत रहाते, तें एक क्षणभरही विश्राति घेत नाही. मी हे केले, हे करतों व हे करीन हे बेत मति करीत रहाते. हा मित्र व हा शत्रु हा विचार माझ्या मर्मावर आघात करीत असतो. अनात्म्याची दुःखें भात्म्या- चीच आहेत, असे समजून हा जीव दीन होतो. तात्पर्य सुख-दुःख-प्रवाहात पडलेला, जरा-मरणवायूनें तुटलेला व जगद्रूपी आवर्तात लोळणारा हा जीव सुकलेल्या पानाप्रमाणे जर्जर होतो ६६. सर्ग ६७-बंध भासक्तिकृत आहे. यारतव भासकि सोडल्याने त्याचे निवारक होते.