पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग ६६-भासाच्या तोंडून व्यक होणारे अज्ञाचे दुःखसागरातील परिवर्तन. श्रीवसिष्ठ-रामभद्रा, संतापाने ज्याचे सर्व अंग शुष्क झालेले आहे असे ते दोघे शोकपरायण झालेले तापसी अरण्यांतील शुष्क वृक्षाप्रमाणे तेथे काही काल एकत्र राहून पुढे विरक्त मनाने दूर झाले व भापला काल घालवू लागळे. दिवस गेला, महिना लोटला, वर्ष झाले, असे करिता करितां भनेक वर्षे निघून गेली व ते दोघेही वृद्ध झाले. तेव्हा ज्यांना विमल ज्ञान प्राप्त झालेले नाही असे ते दोघे जर्जर तापसी पनात स्वैर फिरता फिरता फार दिव- सांनी भेटले असता परस्पर अर्से संभाषण करू लागले.- विलास-मित्रा, बधो, भासा, तुझें स्वागत असो. तूं इतके दिवस मला सोडून कोठे होतास ' बा साधो, तुझें तप सफळ झाले का ? बुद्धि सतापशून्य होऊन तूं आत्मज्ञ झालास का ? तुझी विद्या सफल होऊन तू कुशलवान् झाला आहेस की नाही ? श्रीवसिष्ठ-रामा, असे विचारणान्या, संसाराविषयी अगदी उद्विग्न झालेल्या व महाज्ञानमपन्न मुहृदास तो सुहृद् भास आदराने म्हणाला.- साधो, विलासा, माझ्या प्रिय मित्रा, तुझ्या दर्शनाने मला आनद झाला आहे. पण या दुष्ट ममारात रहाणान्या आमचे कशल फसलें असणार ? ज्ञेय कळल्यावाचून काम संकल्पादिक क्षीण होत नाहीत व काममकल्पमय ससाराचे उल्लघन करण्यापूर्वी माझें कुशल कसे होणार ! केय याने जशा वेली कापतात त्याप्रमाणे चित्तात उद्भवणान्या आशाना अमग शस्त्राने कापून टाकल्यावाचन माझें कुशल कोठचें । जोवर ज्ञान झाले नाही, समता उदय पावली नाही व प्रबोधचद्राचा प्रादुर्भाव झाला नाही तोवर कुशलाचे नावच घ्यावयास नको. बा माधो, आत्मज्ञानाध्या अभावी ज्ञानमहौषध मिळाल्याशिवाय ही ससारमहामारी थांबणार नाही. या ससारवक्षाचा शिशप हा अंकर, तारण्य ही पालवी व जराह पुष्प आहे. त्याच्यावर माक्रोश करणार बाधव हेच गुजारव करणारे भ्रमर भसून जरा-पुष्पापासून मरणमजिरी उत्पन्न होते. मरणोत्तर कर्मानुरूप नरक किंवा स्थावर व जगम योनी यात जन्म घ्यावा लागतो. तेथे दुष्कर्माचा भाग घेत असताना, असा दुःखांचा अनुभव घेत असताना, मन विरस होने. देवक्शात् स्वर्गादिकांची प्राप्ति झाली तरी तेथें अधिक पुण्यसंचय करण्यास मार्ग व अधिकारही नसल्यामुळे सचित पुण्य कर्माचा क्षय