पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६९. नाग त्याचा आश्रय करून रहातात. सारांश तो पर्वत म्हणजे प्रति जग- द्रहच आहे. त्याच्या गुहांमध्ये बसून सिद्धयोगी एकातवास करितात. त्याच्या उदरात निधींचा मोठा साठा आहे. नाग त्यावरील चंदनांचा भाश्रय करितात व त्याच्या शिखरावर सिंह क्रीडा करीत असतात. खाली पडलेल्या, पडत असलेल्या व वृक्षांवर फुलून राहिलेल्या शुभ्रपुष्पाच्या योगानें तो शरत्कालीन मेघाप्रमाणे शुभ्र दिसत असतो. जागजागी लाल धुळीच्या योगाने त्याचे अंग कपिल वर्ण झालेले असते. असो; अशा प्रकारच्या त्या पर्वताच्या उत्तर तटावर, मागें, ब्रह्मलोकासारखा सुदर, स्वर्गासारखा रम्य व शिवपुरासारखा उत्तम अत्रीचा एक मोठा आश्रम होता. त्याच्या आसपास अवर्णनीय सृष्टिसौदर्य पसरले होते. वक्ष फळभाराने नम्र झाले होते. पुष्करणीतून रम्य जल चमकत होते. फुलझाडे आपल्या विविधवांच्या फुलानी त्यास भूपित करीत होती. मोठाल्या घरासारख्याच मोठमोठ्या वेलींच्या जाळ्या, तापसाचे श्रम दूर करीत होत्या. __ असो; अशाप्रकारच्या त्या श्रीमान् व सिद्धाच्या संतापास दूर कर- णा-या अत्रीच्या आश्रमात आकाशमार्गातील शुक्र-बृहस्पतीप्रमाणे तेजस्वी व ज्ञानी दोन तापस रहात होते. एकत्र रहाणा-या त्या दोघाना सरो- वरातील फुललेल्या कमलाकुराप्रमाणे शुद्ध शरीरसंपन्न दोन पुत्र झाले, त्यातील एकाचे नाव विलास व दुसन्याचे भास, असे त्यानी ठेवलें. ते दोघेही पुत्र सृष्टिनियमाप्रमाणे क्रमाने वाढले. ते एकमेकाचे जिवलग मित्र झाले. तिळ व तेल अथवा पुष्प व वास याप्रमाणे ते परस्परसंलग्न होते. शुक्र व बृहस्पती याच नावाचे त्याचे दोघे नेही बापही, अति अनु- रक्त पतिपत्नींप्रमाणे, पुत्र झाल्यावरही वियुक्त झाले नाहीत. त्यांचे मन परस्परांविषयी सारखेच प्रेमळ होतें. असो ते दोघे पुत्र मुनीप्रमाणे त्या आश्रमात राहू लागले. त्यांची बाल्यावस्था संपून तारुण्यास आरंभ झाला. इतक्यात त्याच्या जनकानी जराजर्जरित शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या मुलाची तोंडे म्लान झाली. ते दोघेही परलोकवासी पित्यांकरितां शोक करू लागले. कारण, हे मानद रामा, महात्म्यांसही लोकस्थिति मलध्य असते. त्या मृताचे उत्तर भौर्ष- देहिक कर्म करून दुःखाने व्याकुळ झालेले ते पुष्कळ वेळ भात स्वराने विलाप करून शेवटी मूछित झाले ६५.