पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ११. ८०५ महात्म्याच्या संसर्गाने संसारसागर तरून जाण्याची युक्ति सांपडते. ज्या माळजमिनीवर उत्तम ज्ञानफळे व समाधानरूपी शीतळ छाया यांनी युक्त असलेला सज्जनवृक्ष नसतो तेथें, रामा, एक क्षणभरही राहू नये. स्मितरूपी पुष्पानी ओथबलेल्या (नमलेल्या) सज्जनरूपी चंपक-वक्षापाशी जाताच चित्ताला विश्राति मिळते. बाबारे एकाद्या विश्वास देऊन फसविणाऱ्या ल...डान्या मांडीवर डोके ठेवून निजणे जसें भयकर त्याप्रमाणे अल्पविवेकी पुरुषाचा आश्रय करणे भयंकर आहे. त्यापेक्षा कोणान्याही सगतीला न लागता मीच माझा बंधु व गुरु माहे असे जाणून आपणच आपला उद्धार करून घ्यावा. व्यर्थ अभिमानाने आप. ल्याला जन्मचिखलात फेकू नये. हे काय आहे ? कसे आले? याचे मूळ काय आहे व याचा क्षय कसा होईल ? याचा आपली बुद्धि शास्त्र व सजन याच्या सहायाने विचार करावा. देहाधीन दुःख आहे असे शहाण्यानी प्रयत्नपूर्वक जाणावे. ससारसागरात बुडत असलेल्या आत्म्याला वर काढावयाचे झाल्यास नराना धन, मित्र, विचारशून्य शास्त्रे व बाधव याचा काही उपयोग होत नाही. सतत सहवास करणान्या व भनिशुद्ध झाल्या- मुळे मुहृद्भूत अशा केवल मनाशी विचार केल्यानेच आत्म्याचा उद्धार होतो. वैराग्य व चित्तैकाम्याचा अभ्यास या दोन प्रकारच्या प्रयत्नाने व आत्मपरामर्शजन्य तत्वज्ञानरूप नौकेनें भवसागर तरता येतो. लोका- कडून शोक केला जाणान्या व दुराशेकडून जाळला जाणान्या आत्म्याची उपेक्षा करू नये, तर मोठ्या आदराने त्याचा उद्धार करावा. अहंकार हेच ज्याचे मोठे बधनस्थान आहे, तृष्णा ही ज्याला बाधावयाची दोरी आहे व जन्म याच चिखलामध्ये जो बुडाला आहे अशा जीव हत्तीचा उद्धार करावा. मोहाचा त्याग करून देहाहंकाराचे मार्जन केल्यानेच आत्म्याचे त्राण केल्यासारखे होते. मनोभाव सोडून अहंभाव घालविणे या उपायानेच तो सन्मार्गात प्रवृत्त होतो. देह काष्ठ व वेंकुळ यांसारखा आहे, असे पाहि- ल्यानेच देवेश परमात्मा ज्ञात होतो. अहंकार-मेघ क्षीण झाला की, चिदि. वाकर दृष्टी पडतो. अंधकार हटला की उजेड. त्याप्रमाणे अहंकार तुटला की, आत्मसाक्षात्कार. अहंकाराच्या अभावी निरतिशय आनंदाचा आविभाव होतो. राघवा, त्या पूर्णानंद अवस्थेचेच मोठ्या प्रयत्नाने सेवन करावे. एका तुर्यावस्थेवाचून दुसऱ्या कशाचीही तिला उपमा देता येत नाही.