पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुभुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग १३. म्हणतो त्याचा प्रत्यय येईल. रामा, फार काय सागू ? ब्रह्मा, विष्णु व महेश जसे तृप्त व विकल्पशून्य असतात त्याप्रमाणे आत्मज्ञ पुरुष तृप्त व कृतकृत्य होऊन रहातात. बाबारे, मनाचा मोह गेला, भ्राति नाहीशी झाली, शम हाती आला, चित्त प्रसन्न झाले; तत्त्व समजलें व व्यापक आत्म्याचा साक्षात्कार झाला म्हणजे हे जग रमणीय विहारस्थान होते. त्याच्यापासून पीडा होत नाही. तोडलेल्या वृक्षाप्रमाणे जड असलेला हा देह रथ आहे, इद्रिये घोडे आहेत, प्राणासह मन हा लगाम आहे, बुद्धि हा सारथि आहे व भोक्ता जीव रथात बसणारा रथी आहे, असे जो समजतो व आपल्या निरुपाधिक स्वरूपास (उपाधिभूत अशा ) त्या सर्वाहून भिन्न जाणतो त्यास हे जग आनददायी होते १२. सर्ग १३-वैराग्यादि गुण व जीवन्मुक्ति-फलाने युक्त असलेला शम याचे येथे विशेषत वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामा, या परमार्थदृष्टीचा आश्रय करून जे सुज्ञ आम्यास पाहतात ते महात्मे या ससारात आनद भोगितात. अनिष्ट अवस्था प्राप्त झाली तरी ते शोक करीत नाहीत; इष्ट अवस्था यावी अशी इच्छा करीत नाहीत, शुभ व अशुभ यास ते भिन्न पहातच नाहीत, असे मटले तरी चालेल. ते लौकिक-दृष्ट्या सर्व करितात. पण म्वत च्या समजुतीप्रमाणे काही करीत नाहीत. कारण शरीरादिकाच्या हालचालीमुळे होणारे कर्म निर्विकार आत्म्याचे आहे, असे ते कधीच समजत नाहीत. ते निर्लेप होऊन रहातात. केवल शास्त्रीय कर्मच करितात. लौकिकातील सन्मागाने जातात जीवास नावडती वस्तु हेय ह्मणजे त्याज्य वाटते व आवडती वस्तु उपादेय ह्मणजे सग्राह्य वाटते, असा सामान्य नियम आहे पण आत्मज्ञ यातील एकाही पक्षाचा अगी- कार करीत नाही. तर तो उदासीन होऊन आत्मस्वरूपातच तल्लीन होतो. आत्मसाक्षात्कार झाला असता मन सर्व चेष्टा सोडून व शात वृत्ति धारण करून सुखी होते. कारण विक्षेप हे दुःखाचे निमित्त आहे. आणि विषयाचे मनन व कौतुक हे विक्षेपाचे हेतु आहेत. यास्तव विषयमनन आणि कौतुक याच्या अभावीं विक्षेपाचा अभाव, विक्षेपाभावी दुःखाचा अभाव व दुःखाच्या अभावीं परमानदाचा भाव होणे युक्तच आहे. आत्मा हीच एक सत्य व आनदरूप वस्तु आहे आणि तदितर