पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६४. तुच्छ व अतुच्छ मनःस्थिती फार दिवसांपासून क्षीण झाल्या आहेत. देश कालवशात् लोक तुच्छाला भतुच्छ व मतुच्छाला तुच्छम्हणत असतात यास्तव शहाण्यानी कोणत्याही पदार्थाची तुम्छ किंवा भतुम्छ बुद्धी निंदा-स्तुति करूं नये. लोकामध्ये आसक्तीमुळे, प्रेमामुळे, निंदा व स्तुति प्रवृत्त होतात. प्रेम इष्ट वस्तूचीच इन्छा करते. पण शोभनबुद्धि पुरु भति उत्कृष्ट पदार्थाची वाछा करतो. या त्रैलोक्यातील स्त्रिया, पर्वत, समद्र वनें, भूतें व इतर सर्व असार आहे. त्यात वस्तुतः सार नाही. मास, हाडे काटे, माती, दगड यानी भरलेल्या या जगात मला इच्छा करण्या सारखे काही आढळत नाही. कारण जेथे सर्वच शून्य तेरे इन्छा कशाची करावयाची 2 दिन-लक्ष्मी गेली म्हणजे प्रकाश व ऊन याचा जसा आपोआप क्षय होतो त्याप्रमाणे वाछाच निवृत्त झाली म्हणजे राग-द्वेषाचा क्षय होतो. असो; उगीच विस्तृत भाषण करण्यात काह अर्थ नाही. मन विरक्त व वैषम्यशून्य होऊन जर आत्म्यामध्येच मुदिर झाले तर तीच प्रतिष्ठा व विश्राति होय. यास्तव याच एका उचित : सुखकर दृष्टींचे सदा सेवन करावें १३. सर्ग ६४-ज्याच्या योगानें पुरुष मनोदोषांनी दूषित होत नाही व आत्म्याच दुखांतून उद्धार करिता येतो ते उपाय. श्रीवसिष्ठ-याप्रमाणे जगदमाचा विचार करून व एकमेकाचा मोठ भादर करून सतुष्ट झालेले ते दोघे आपापल्या व्यापारात निमग्न झाले राघवा, तूही याच युक्तीने आत्मज्ञ हो. सुरघु व पर्णाद याचा संवाद ऐकून त्याप्रमाणे निश्चय केल्याने आत्मबोध होणे शक्य आहे व हाच बोट सुप्रतिष्ठित झाला असता परम पदाची प्राप्ति अनायासे होते. विद्वानां बरोबर विचार केल्याने बुद्धि तीक्ष्ण होते. हृदयाकाशांतील सहकार मेघ नाहीसा होतो व चिदाकाश प्रसन्न होते. जो सत्य आत्मविचारांर निमग्न असतो, सदा अंतर्मुख व सुखी असतो, सतत चित्चें अनुसंधान करीत रहातो त्याचे मन शोकानें बाधित होत नाही. तो व्यवहार करीत असतानाही, रागद्वेषमय आहे, असे वाटत असले तरी चित्तांत कलंकमर होत नाही. जो मुनि यथार्थज्ञानवान् , शुद्ध, व शांत असतो त्याला मन पीड देऊ शकत नाही. ज्ञानीपुरुषाचे चित्त भोगैकशरण व दीन झालेले नसते त्याचे चित्त क्षुद्र सुखाविषयी निस्पृह असते. जसा एकादा विरक्त पुरु