पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. चित्त एक क्षणभरही विज्ञानदृष्टीस सोडून रहात नाही. काल आपल्या गतीस जसा कधी विसरत नाही त्याप्रमाणे प्राज्ञाची बुद्धि स्वात्म्याला कधीही विसरत नाही. वायूला आपल्या गतीचे जसे कधी विस्मरण पडत नाही त्याप्रमाणे प्राज्ञबुद्धीला चिन्मात्राचे विस्मरण पडत नाही. सत्ताशून्य पदार्थ जसा कोणाच्या कधी अनुभवास येत नाही त्याप्रमाणे ज्ञान्याचा आत्मज्ञानशून्य काल केव्हाही अनुभवास येत नाही. या ससारात गुणी पुरुष गुणहीन असणे जसे अशक्य, त्याप्रमाणे आत्मज्ञ आत्मज्ञान. शून्य असणे अशक्य आहे. मी सदा संबुद्ध, सदा निर्मल, सदा शातव सदा समाहित आहे. आत्मभिन्न वस्तुच नाही, असें जाणणाऱ्या माझ्या समाधीचा भेद कोण कसा करणार ? यास्तव मित्रा, मी कधी एकातात समाधि लावून बसत नाही व सदा आत्मतत्व पाहणाऱ्या मामें समाधान कधी तुटत नाही. सर्वथा सर्व आत्माच असल्यामुळे असमाधि व समाधि या शब्दाचा अर्थच माझ्या व्यानात येत नाही ६२. सर्ग ६३-परिघाने स्तुति केली अमतां सुरघु आपल्या सहज स्थितीचे वर्णन करतो. परिघ-जन, तूं खरा आत्मज्ञ आहेस. तुला परम पद प्राप्त झाले आहे. तुझें अंतःकरण अतिशय शीतळ असून तूं पूर्ण चद्राप्रमाणे शोभत आहेस. आनंदमकरदाने भरलेला तूं परा लक्ष्मीने आश्रय केल्यामुळे कमलाप्रमाणे शीतळ, स्निग्ध व मधुर झाला आहेस. तू निर्मल, अहकार- शून्य, गंभीर, स्वस्थ, संतुष्ट व इष्टानिष्टाविषयी वीतराग (विरन) होऊन शोभत आहेस. तु आपल्या विशाल बुद्धीने सारासार निर्णय केला आहेस. हे सर्व अखंडित ब्रह्मरूप आहे, हे न जाणतोम. तुझे शरीर आशाजन्य चाचल्याने रहित आहे. अतःस्य अमृताच्या योगानें तृप्त होणान्या क्षीरसागराप्रमाणे अनुत्तम पात्मतत्त्वाच्या योगाने हे सुदरा, तुं तृप्त झाला आहेस. मुरघु-मुने, दिसणारे हे सर्व अभावम्प असल्यामुळे त्यांत भाम्हाला ग्राह्य काहींच वाटत नाही. प्राह्याच्या अभावी त्याज्याचाही अभाव झाला आहे. कारण ग्राह्याच्या अपेक्षेनें त्याग्याची कल्पना होत असते. जे तुच्छ असते ते त्याज्य व जे अतुष्ठ असते से प्राप. माणन म्हणावे तर सर्व भाव तुच्छ असल्यामुळे व कालत: तेच अतुच्छ असल्याकारणाने माझ्या