पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६९. ९०१ धन्य झालो. एकाद्या स्निग्ध मित्राचे दर्शनही जर अवर्णनीय सुख देत असते तर तुझ्यासारख्या ब्रह्मभूत स्निग्ध महात्म्याचे दर्शन आनंदशिखरा- वर बसवील यात काय संशय आहे ? साधुसग परमपदप्राप्तीसारस आहे. राजर्षे, तुझ्या आगमनाने सर्व सपत्ती माझ्या अग्रभागी उभ्या अहित. हे महानुभाष, तुझें मधुर वचन माझ्या सर्वागावर जणुं काय रसायनाचाच वर्षाव करीत आहे. तुझे नुस्ते पाहणेही अतिशय पुण्यरूप आहे ६१. सर्व ६२-विद्वानाचे समाधान. श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे बराच वेळ बोलून व एकत्र राहून परिघ स्नेहपूर्ण वाणीने म्हणाला, " राजन् , या संसारात जे में कर्म केले जातें तें तें शातचित्त पुरुषास सुख देते. यास्तव विक्षेपदुःखरहित व सांसारिक सुखाहून उत्तम अशा समाधानसुखाचा तूं एकांतात बसून अनुभव घेतोस का? सुरघु-भगवन् , सर्व संकल्परहित व परम शात समाधि कशाला म्हणतात ? कारण जो ज्ञानी असतो तो केव्हां तरी असमाहितचित्त असतो का? ज्याचे चित्त सदा प्रबुद्ध असते ते आत्मनिष्ट असल्याकार- जानें जगत्क्रिया करीत असले तरी सदा समाधानाचाच अनुभव घेत असतात. चित्त जर शात झालेले नाही तर नुस्ते पद्मासन घालून बसल्याने व ब्रह्माजलि जोडल्याने काय होणार ? भगवन् तत्त्वाचा साक्षात्कार हा सर्व आशातृणाचा अग्नि आहे. समाधिशब्दाने त्याचाच निर्देश करीत असतात. हातपाय जोडून व तोड आवळून धरून बसणे ही समाधीच नव्हे शात, नित्य तृप्त व यथाभूत अर्थ दाखविणारी परा प्रज्ञाच समाधि होय. अक्षुब्ध, निरहंकार व द्वंद्वाच्या मागून न जाणारी मेरूसारखी अति स्थिर आकृतिच समाधिशब्दाचा अर्थ आहे, असें मी समजतो. परिपूर्ण व निश्चिंत मनोगतिच समाधि आहे. ज्या क्षणापासून मन बोधयुक्त होते तेव्हापासून महात्म्याचे अछिन्न समाधानच सुरू होते. ज्ञानी पुरुषाच्या मनाचे समाधान कधी व्युच्छिन्न होतच नाही मसें मी जाणतो. सूर्य सर्व दिवसभर जसा प्रकाशरहित होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्माकार वृत्ति देह पात होऊन विदेह कैवल्य मिळेपर्यंत तखा. बोलनास सोडीत नाही. नदीचा प्रवाह जसा एकसारखा जात असतो लाप्रमाणे बानी पुरुषाच्या चिचसमाधानाचा प्रवाह सतत चालतो. सारे