पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार, चेष्टा, विश्वासाने सांगितलेल्या गोटी इत्यादिकांचे स्मरण झाल्यामुळे मला फिरून फिरून हर्ष होत आहे. तुला जसें मांडल्याच्या प्रसादाने ज्ञान प्राप्त झाले आहे त्याप्रमाणे मला तपाच्या योगानें प्रसन्न केलेल्या परमेश्वराच्या अनुप्रहाने ते लाधले आहे. आतां तूं दुःखरहित झाला माहेस ना ? तुझ्या चित्ताला विश्रांति मिळाली की नाही! आत्माराम झाल्याकाणाने तुझ्या चित्तामध्ये सुंदर प्रसाद उत्पन्न झाला की नाही ? सम, सुप्रसन्न व गंभीर दृष्टीनेच तूं सर्व उचित कार्य करतोसना! तुझी स प्रजा आधि-व्याधिशून्य ज्वररहित आहे की नाही ! पृथ्वी फल- पूर्ण होऊन जनसमूहाचे मातेप्रमाणे पोषण करीत असते ना ? तुझें पावन श दिशांमध्ये पसरते की नाही ! आपल्या गुणसमूहानें तूं या सर्व भूमं- डलास भशून्य करून सोडलें आहेस असें मी जाणतो. कारण लहान- मोठ्या प्रामाच्या सीमेवरील शेताचे रक्षण करावयास बसलेल्या कुमा- रिका मोठ्या हर्षाने तुझें आनंददायी यश गात असतात. असे मी ऐकलें आहे. धान्य, धन, वैभव, भृत्यवर्ग, स्त्री, पुत्र, नगर व स्वतः तुझे हे नवद्वारयुक्त शरीरसज्ञक गृह कुशल माहे की नाही? ही कायलता आधिव्याधिशून्य असल्यासच तिच्या द्वारा ऐहिक व पारलौकिक फल मिळत असते. सकृद्दशेनी रमणीय वाटणाऱ्या व अत्यंत बैरी अशा या विषयस- पौविषयी तुझें मन विरक्त हालें असेलच. अरे अरे, आज किती दिवस आपण एकमेकास सोडून दूर राहिलो होतो बरें ? खरोखर फार दिव. सांनी आज आपली पुनः गाठ पडली आहे. मित्रा, जीवत प्राण्यास या जगात सयोगजन्य अनेक सुखदुःखदशा पहाव्या लागतात. त्यांतीलच आपली आज पुनः गांट पडणे ही एक दशा माहे. नियतीचे कृत्य काही विचित्र आहे; यात संशय नाही. मुरघु-भगवन् , या देवीनियतीची गभीर व विस्मयास्पद गति कोण जाणणार ! आपणांस फार दूर नेऊन तिने पुनः माज एकत्र केलं आहे. तुझ्या आगमनाने माझ्या मनाला संतोष झाला आहे. मी माज पावन वालों प्राकृत जनाचे दर्शन दुर्लभ नसल्यामुळे त्यापासून इतका आनद होत नाही. पण तुजसारख्या सत्पुरुषाचे दर्शन महापुण्यानेच होणार क त्यामुळे दुर्लभ असल्याकारणाने माझ्या चिचाप्रमाणेच शरीरही मानंदित होऊन रोमांचाच्या द्वारा ते त्याला व्यक्त करीत बाहे. खरोखर मी आज