पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ११. श्रीवसिष्ठ-रामचंद्रा, ज्ञानी झालेला सुरघु व पर्णाद राजा यांचा हा अद्भुत वृत्तात तूं ऐक. एकसमाधानामध्येच ज्यानी आत्म्याची योजना केली आहे असा त्या दोघांचा परस्पर झालेला सवाद मी तुला सांगतों, पारसीकाचा परिघ किंवा पर्णाद या नावाचा राजा होता. नदनवनस्थ माधव व मदन याच्याप्रमाणेच सुरघु व परिव याची मैत्री होती. प्रजेच्या पापामुळे परिघाच्या राज्यात अवषे झाले त्यामुळे दुष्काळ पडून भूक व तहान यानी व्याकूळ झालेली प्रजा नष्ट झाली. वणव्यात सापडलेल्या प्राण्याप्रमाणे त्याची अवस्था झाली. आपल्या प्रजाजनाचें तें दुःख पाइन दयाळु परिघाचे चित्त आई व व्याकुळ झाले. वाटसरु आग लागलेल्या गावाला किंवा घराला सोडून जसा जातो त्याप्रमाणे तो सर्व राज्य सोडून निघाला. प्रजामहारास प्रतीकार करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे मुनी- प्रमाणे तप करण्याच्या उद्देशाने तो अरण्यात गेला. तो विरक्त पुरुष, लोका- तराप्रमाणेच, पौरजनास कळणार नाही, अशा एकान स्थानी जाऊन राहिला. इद्रियाचा निग्रह करून तो शातमति पुरुष गुहामदिरात तप करूं लागला. वाळलेली वृक्षाची पाने खाऊन तो शरीरयात्र करीत असे. अग्नीप्रमाणे दीर्वकाल पर्णभक्षण केल्यामुळेच त्याला पुढे ।।द असे नात्र प्राप्त झाले होते. तो मुनींच्या आश्रमात प्रख्यात झाला ___ याप्रमाणे पुष्कळ दिवस तप केल्यामुळे चित्तशुद्ध होऊन आत्मविचा- गन्या योगानें तो ज्ञानी झाला. तो शीतोष्णादि द्वदरहित, नगश, शांत. चित्त, आसक्तिरहित व दयाशून्य जीवन्मुक्त झाला, तो य' 'क्य मठीमध्ये सिद्ध व साध्य यासह यथेच्छ संचार करू लागला. एक, नो सुरघुच्या घरी गेला. तेव्हा त्या प्राक्तन मित्रानी परस्पराचा साकोस. मूर्खता. रूपी गर्भातून बाहेर पडलेले ते दोघेही तृप्त व ज्ञन' दाने 'महाहा भाज माझे पुण्य फळास आले' असें परस्पराच्या दर्शन ने संतुष्ट झालेल्या त्यांनी एकमेकास म्हटलें; एकमेकांच्या शरीरास आलिंगन दिले व ते दोघेही एका आसनावर बसले. परिघ-तुझ्या दर्शनाने माझ्या चिचाला मोठा आनंद झाला आहे. चंद्रबिंबामध्ये बुडी मारल्याप्रमाणे माझें मन शीतळ झाले आहे. शाखा तोडल्या असतां वृक्ष जसा जोराने फोफावतो त्याप्रमागे खाभाविक प्रेम वियोग झाला असता, विस्तार पावते. भापल्या मागच्या सर्व मन,