पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९८ बृहद्योगवासिष्ठसार. होऊ दिले नाही. ई व क्रोध यास सोडून तो प्रत्यही आपले कार्य करीत असे. ज्याचे शरीर उदार व गंभीर आहे असा तो सागरतुल्य दिसू लागला. त्याची चित्तवृत्ति निजल्याप्रमाणे स्वस्थ झाल्यामुळे तो निष्कंप व प्रकाशमान शिखायुक्त दीपाप्रमाणे दिसत असे. निर्दय नाही, दयाळूही नाही, द्वंद्वयुक्त नाही, मत्सरीही नाही, बुद्धिमान नाही व अबुद्धिमान् नाही, सकाम नाही व निष्कामही नाही, असा तो झाला. स्थिर व सम चित्तवृत्ती- मुळे तो फारच शात दिसत होता. जगत् हा सर्व चित-तत्त्वाचा खेळ आहे, असे विचारपूर्वक जाणल्यामळे मुग्वदुःखशून्य झालेली त्याची मति परिपूर्ण व तृप्त झाली. तो सर्व व्यवहार करीत असतानाही समाधिस्थ असल्याप्रमाणे होता. साराश हे रघुवंशजा, अशा नि मगवृत्तीने राज्य करीत त्याने अवशिष्ट दीर्घ आयुष्य घालविले. प्रारब्ध क्षीण झाले अमता त्याचा देहसनक माकार आपोआर पडला. त्यामुळे घटभगानतर महाकाशात मिळून जाणान्या घटाकाशाप्रमाणे याचा भामा परा म्याशी ऐक्य पावला. औपा- धिक भंद जाऊन स्वाभाविक अभेद मिद्ध झाटा. नयाचे जल सागरात जाऊन तप झाल्यावर जमें भिन्न करून दाखविता येत नाही न्याप्रमाणे कारणेश्वरात जाऊन मिळालेल्या याचा पृया अवमाम होईनासा झाला. तो महात्मा स्वय परम्वार झाला १०. सर्ग ६१ -सुका परिवाना झालेला सवाद. श्रीवमिष्ठ-याप्रमाणे हे राघवा, हशोकादिकाना निमिन होणान्या पापाचा नत्वाचान ममूल उछेद कम्न तूही अद्वय पदाम प्राप्त हो व शोकशून्य होऊन रहा. बालकाप्रमाणे घोर भज्ञानतमात बुडालेले मन या दृष्टीचा आश्रय करन दीप मिळाल्याप्रमाणेच जणु काय सतप्त होत नाही. खोल विहिरीन पहत असताना एकादी रद येल हाती लागल्या. प्रमाणे विवेकाच्या योगाने मन मुवी होते. याम्तव तू माता याच दृष्टीचे पुनः पुनः परिशीलन करन दुमन्यास तिचाच उपदेश करीत नित्य एक- समाधानयुक्त हो. म्हणजे तू या सर्व भूतलाला भूषित करशील. श्रीराम-पण गुरुवर्य, वायने हालणान्या मोराप्पा भगावरील पिसांप्रमाणे चंचल मन एक-समाधानयुक्त कसे होईल!