पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ६.. माकारमय भाभास स्वयं भात्माच आहे व मात्माच परा चित् माहे. तो झ मामा भात्मा ज्यापी (जगामध्ये अनुगत) आहे. माझ्या बुद्धीचा साक्षिणी अशी ही चिच्छक्तिच तो आत्मा होय. ती चित्च द्रष्टा, दृश्य इत्यादि भेदाने युक्त होत्साती ' मी राजा' असा भ्रम, या शरीरांत राहून, करीत होती. या चित्रच्या प्रसादाने मन देहरथामध्ये राइन संसारजाल- लीलेमध्ये जाते, व्यवहार करतें व नाचते. पण मन, शरीर इत्यादि हे सर्व वस्तुतः नाही. यास्तव यातील काही नष्ट झाले तरी माझे काही नष्ट होत नाही. हाय हाय, या चित्तनटांनी हे जगज्जालमय नृत्य चालविलें आहे व तें या एकाच बुद्धिसंज्ञक दीपज्योतीच्या योगाने दिसते. हं! मी देहसबधी निग्रहानुग्रहचिंता व्यर्थ करीत होतो. कारण देह म्हणजे वस्तुतः काही नाही. अहाहा! मी माता जागा झालो आहे. माझें दुर्दर्शन गेले. सर्व द्रष्टव्य मी पाहिले व ज्ञातव्य जाणले. हे जे सर्व जगद्गत दृश्य दिसत आहे त्यात चिदशावाचून दुसरे काही शाश्वत नाही. मग सर्व ब्रह्मच जर आहे तर निग्रहानुग्रह, हर्ष-शोक, सुख-दुःख इत्यादि कसे व कोठें रहाणार? मी भाजवर मूर्ख होतो म्हणून त्याच्या योगाने व्याकुळ झालो. आता हा सुंदर भात्मा मला दिसला आहे. अथवा मीच स्वतः आत्मा झालों भाहें. अथवा मी आत्मा आहे, या सत्य स्थितीचे मला आज स्मरण झाले आहे. त्यामुळे मला किती सुख होत आहे म्हणून सागू ? अथवा त्या अनि- वाच्य व स्वसवेद्य सुखाविषयी मी काय सागू शकणार ? हे भगवन्, आत्मन् , तुला नमस्कार असो; मी आता यापुढे तुला सोडून एक क्षण- भरही रहाणार नाही १९. सर्ग ६०-मरणपर्यंत सुरघूचा असंग भाचार व त्या जीवन्मुक्ताची देहपातानंतर विदेहमुक्ति. श्रीवसिष्ठ-रामराया, याप्रमाणे त्या किरातराजाला विवेक व निश्चय याच्या योगाने अनुत्तम पद मिळाले. विश्वामित्राने केवल स्वप्रय- लानेच जसें ब्राह्मण्य संपादन केले त्याप्रमाणेच सुरघूनें केवल स्वपौरुषाने ते पद मिळविले. वारंवार उदय पावून दिवस करणान्या सूर्या- प्रमाणे अनाकार कार्ये फिरफिरून करीत असतानाही तो खिन्न झाला नाही. त्या दिवसापासून तो सर्वदा संतापशून्य होऊन राहिला. आपली मम-विषम कार्य करीत असतानाही त्याने आपल्या चित्तास विकारयुक