पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १९. ७९५ झालेलं चित्त क्षुद्र कार्यामध्येही निमग्न होते. चित्त वासना व सर्व दृश्याचा भाश्रय करणारी दीनता यांच्या योगानें, चिखलांतील किड्याप्रमाणे, मोहांत बुडते. जसा जसा सर्वस्वत्याग करूं लागावे तसा तसा स्वयंज्योति परमात्मा अवशिष्ट रहातो. शुद्ध सोने हाती लागेपर्यंत खाणीतून काढलेल्या सोन्याच्या धातूचे जसे वारवार शोधन करतात त्याप्रमाणे आत्मा मिळेपर्यंत सर्व वस्तूचे परीक्षण करावे लागते. सर्वदा सर्व ठिकाणचे सर्व दृश्य सर्वथा सोडून दिले म्हणजे पूर्णात्मा आपला आपल्यालाच मिळतो. जोपर्यंत सर्व अनाम-वस्तूचा त्याग केला नाही तोपर्यत आत्मा हाती लागत नाही. सर्व अवस्थाचा त्याग केल्यावर बाकी राहणाराच आत्मा होय, असें विद्वान् सागतात. व्यवहारात सुद्धा जर एकादि सामान्य वस्तु, तिच्या विरोधी वस्तूंचा त्याग केल्यावाचून मिळत नाही तर स्वात्मलाभाविषयी काय सागावें ? राजन् , पुरुष ज्याच्या लाभाकरिता सर्व भागा इतर सर्व कार्याचा त्याग करून स्वतः प्रयत्न करतो तेंच त्याला प्राप्त होते. दुसरें काही लाभत नाही. यास्तव आपल्या आत्म्याच्या दर्शनाकरिता सर्व दृश्याचा त्याग करावा आणि सर्वाचा त्याग केल्यावर त्याग करिता न येण्यासारखे असे जे काही रहातें तेंच परम पद होय, असे जाणावें. बा सुरघो, तृही याच उपायाने आनंदात्म्यास प्राप्त हो १८. सर्ग ५९-बाय व आभ्यंतर दृशाचा त्याग करणाऱ्या सुरघूला विचाराने मात्मलाभ झाला. श्रीवसिष्ठ-रघुविरा, माडव्य महर्षि सुरघूला असा उपदेश करून आपल्या आश्रमास गेला. त्यानंतर राजा एका शुद्ध एकातस्थानी बसून मी कोण ? असा आपल्याच बुद्धीने आपल्यापाशी असा विचार करूं लागला.-- __ मी मेरु नव्हें, माझा मेरु नव्हे. मी जग नव्हे व माझें जग नव्हे. मी पर्वत नन्हें व ते माझे नव्हेत. मी पृथ्वी नव्हें व माझी पृथ्वी नव्हे. हे किरातमंडल माझे नव्हे व मी स्वतः किरातमडल नव्हे. तर लोकांच्या समतीने पट्टाभिषेकादिकांच्या योगाने उद्भवलेल्या 'मी राजा' या कल्पनेनेच हा देश माझा झाला आहे. यास्तव मी ही कल्पना सोडतो. मी हा देश नन्हें व तो माझा नव्हे. आता राहिली ही नगरी. पण तिच्याविषयीही हाच निश्चय आहे. पताका, भृत्यवर्ग, चतुरगसेना, वाहनें, भाबालवृद्ध पौर