पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ बृहद्योगवासिष्टसार. पाइन तो आपल्या चित्ताचे रजन करून घेतो. त्यास या सृष्टीतील एकही पदार्थ बद्ध करू शकत नाही. पण असे यथार्थ ज्ञान ज्यास नमते त्यास सर्व बध व सर्व दुःखें होतात. हा ससार अति कठीण आहे प्राण्यास हा सर्पाप्रमाणे दश करितो, तरवारीच्या धारेप्रमाणे तोडतो. भाल्याप्रमाणे वेध करितो, दोरीप्रमाणे बांधतो, अग्नीप्रमाणे जाळतो, रात्रीप्रमाणे अध करितो, निशंकपणे घाला घालतो, उंचावरून मस्तकावर पडलेल्या पाषाणाप्रमाणे मोहित करितो; बुद्धीचे हरण करितो, मर्यादेचा नाश करवितो, मोहरूपी अधकूपामध्ये पाडतो व तृष्णेच्या योगाने जर्जर करून सोडतो तात्पर्य, ससारी जीवास भोगावे लागत नाही, असे एकही दुःख नाही या भयकर विषय-रोगाची चिकित्सा न केल्यास अनेक नरकाची प्राप्ति होते. त्यातील दुःखाचे वर्णन करवत नाही. पाट्यावर चटणी वाटतात त्याप्रमाणे यमदूत त्याच्या शरीरास वाटतात, विळीवर कापतात, अगात खिळे बोचतात; करवतीने करवततात, तरवारीने तुकडे उडवितात; उचावरून फेकून देतात, पाषाणानी मस्तके फोडितात, डोळे काढितात, कान उपटतात; चदनान्या खोडाप्रमाणे घासतात, तरवारीच्या धारेवरून चालवितात; लोखडाच्या तापवून लाल केलेल्या साखळ्या अगास बाधितात, सोलतात, व अशा प्रकारच्या अनेक यातना भोगाव्या लागतात. यास्तव, राघवा, सुज्ञ पुरुषाने अशा या चचल व कष्टकर ससारचक्राकडे दुर्लक्ष्य करू नये. पढे सागितल्याप्रमाणे विचार करावा. शास्त्राचे चितन करावे. म्हणजे कल्याण होते. मग असे जर आहे, तर शास्त्रपरायण लोकासही अनेक अनर्थ का भोगावे लागतात ? म्हणून विचारशील तर सागतो. मोठे ध्यानपरायण मुनी, मत्र-जपपरायण ऋषी, कर्मठ ब्राह्मण, व जनकादि राजर्षी यास बाह्यतः जरी दुःख झाल्यासारिखें इतरास वाटत असले तरी ते अज्ञजनाप्रमाणे व्याकुळ होत नाहीत. कारण ते ज्ञानकवचाने आन्छा- दित झालेले असतात. दुःखाच्या प्रथम क्षणी ते किचित् व्याकुळ होतात न होतात तोच त्याचा विवेक जाग्रत होतो. विवेक-जानतीनतर कितीही असह्य दुःख सहन करिता येणे फारसे कठिण नाही. सकट- प्रसगी मूर्खाची अवस्था कशी होते, ते पहावे व विवेक्याची मुखचर्या कशी प्रसन्न असते, तेही सूक्ष्मदृष्टीने अवलोकन करावें. म्हणजे मी काय