पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५८. श्रीवासिष्ठ--याविषयीं असा एक पुरातन वृत्तांत सांगतात. हा किरा- तेश सुरघूचा वृत्तांत मोठा आश्चर्यकारक आहे. उत्तर दिशेत कैलास पर्वत या नांवाचे एक हिमालयाचे शंग असून ते विष्णच्या क्षीरसागराप्रमाणे, इंद्राच्या स्वर्गाप्रमाणे व ब्रह्मदेवाच्या नाभिकमलाप्रमाणे शंकराचे गृह आहे. तो कैलास पर्वत, चंचल लहरींनी शोभणान्या सागराप्रमाणे, हालणारे रुद्राक्षवृक्ष व अप्सरा यांच्या योगाने सोभत होता. मत्तगणांच्या स्त्रियांकडून चरणांनी तुडविले गेलेले सुखी विलासी तेथे अशोकवृक्षाप्रमाणे विराजमान होत होते. त्या पर्वताच्या ज्या दिशेत शंकर संचार करीत असे त्या दिशेतील चंद्रकांत-मणीच्या द्रवाचे प्रवाह सुरू होत असत. तो पर्वत लता, वृक्ष, गुल्म, वापी, हद, नद्या, नद, हरिणे, इतर पशुगण व दुसरी नानाप्रकारची भूर्ते याच्या योगाने ब्रह्मांडाप्रमाणेच सदा भरलेला होता. त्याच्या पायथ्याशी, वटवृक्षाच्या मुळाशी रहाणान्या मुग्यांप्रमाणे, हेमजटा नांवाचे किरात असत, भासपासच्या भरण्यातील फलपुष्पांवर ते मापन निर्वाह करीत होते. त्यांचा एक उदारात्मा, पराक्रमी व प्रजारक्षणामध्ये दक्ष असा राजा होता. त्याचे नाव सुरघु. तो बलाच्य असुरनाशक वीर पराक्रमामध्ये सूर्याप्रमाणे होता. तो मूर्तिमान वायुच आहे, असा त्याच्या वेगावरून भ्रम होत असे. राज्यवैभव व धन यांच्या योगाने त्याने कुबेरास जिंकलें; बोधाच्या योगाने देवगुरूस पराभूत केलें 4 कान्यांच्या योगाने असुराचार्यास तुच्छ करून सोडले होते. तो प्रथम काही दिवस निग्रहानुग्रह- क्रमाने प्राप्त कार्ये अखिन्न मनाने करीत असे. पण पुढे निग्रहामुळे प्राण्यांस होणारे दुःख व अनुग्रहामुळे होणारे सुख पाहून त्याला मोठी चिंता लागली. अगोदरच पीडलेल्या या लोकांना घाण्यांत घातलेल्या तिळांप्र- माणे मी आणखीं कसें पीहूं ! मजप्रमाणेच याही सर्व भूतांना दुःख होत असेल. यास्तव अपराधी लोकाना मी धन वाटतो. कारण धनाच्या योगाने सर्व आनंदी होत असतात. धन मिळाले म्हणजे सर्वच माझ्या सारखे भाग्यवान् होतील व मग निग्रह करण्याचा प्रसंगच येणार नाही. अथवा निग्रहावाचून प्रजा आपापल्या मर्यादेत रहाणार नाही. यास्तव प्रात निग्रह केलाच पाहिजे. असे म्हणून तो मोठ्या खेदाने राज्यकार्ये कर लागला. एकाद्याला दंड करण्याचा प्रसंग माला असता 'अरेरे, या विचा- ज्याला भातां मला दंड करावा लागणार ! काय कर!' असे माल