पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७९२ वृहयोगवासिष्ठसार. भासतो असा संदेकरूप अनंत व पूर्णाकृति भात्मा मालस्वरूपातच स्थित असतो. ___ रामभद्रा, या वचनपद्धतीने मी तुला महंतादि व जगत्तादि मेद नाही, हे दाखविले. चित नाही, चेता नाही व जगवादि भ्रम नाही. तर शांत अधिष्ठान चिन्मात्रच आहे. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणीच भावादि रूपास प्राप्त होते त्याप्रमाणे मायावी ज्ञाता (सर्वज्ञ) मायेने भावृत झालेल्या ज्ञप्तिरूप आत्म्यामध्ये महतादि व जगत्तादि भावास प्राप्त होतो. ज्याप्रमाणे जलामध्ये द्रवत्व व वायूमध्ये स्पंद असतो त्याप्रमाणे परमार्थतः ज्ञप्तिमात्ररूप आत्म्यांत महंता, देश, काल इत्यादि स्वाभाविकपणेच असतें. आता तूं कदाचित् विचारशील की, जीव व जगत् याच्या रूपामध्ये जर ज्ञप्ति अनन्य आहे तर जीव व ईश्वर या भावांमध्ये जप्तीचा कोणता विशेष आहे ? तर सागतो. ईश्वर आवरण व परिच्छेद यांनी रहित असलेल्या आपल्या ज्ञानाभिवृद्धीने ईश्वरभावातील निरतिशय आनंदरूप स्वरूपज्ञान नित्य जाणतो. 'पण मी' तो अशा अहंकार-स्थूल-देहरूप जीवभावास प्राप्त झालेला चेतनभूत असाही तो जीवनास कारण होणान्या प्राण, इंद्रियें। विषयसंबंधरूप अध्यासाच्या योगाने भात्मा जीवादिरूपच आहे, असे जाणतो. तत्त्वतः त्याला जाणत नाही. हा त्या दोघांमध्ये विशेष आहे. एवढ्या साठीच जीवाला जशी जशी भ्राति होते तसा तसा ईश्वर विवर्त पावतो. सच्छास्त्र व गुरूपदेश, याच्या योगानें साधकाला जेव्हा भोग्य व भोक्ता याचे सार कळते तेव्हा दोघांचेही अधिष्ठान चिप असल्यामुळे जीवेश्वरांमध्ये अत्यत भेद रहात नाही. जीव ष ईश्वर याच्यामध्ये भेद पाडणारे अज्ञान नाहीसे झाले म्हणजे प्राज्ञ व तुरीय यांच्यामधील भेदही निवृत्त होत असल्याकारणाने अखड पूर्णानंदकैरस चिन्मात्र साम्राज्य सिद्ध होते. सारांश, राजपुत्रा, सर्व जगत् सर्वतः पूर्णप्रकाशरूप, भामंदैकरस, विषय व लक्षण यांनी रहित व शांत प्रारूप माहे. पण सर्व प्रशांत आहे, असे म्हणणे सुद्धा वाच्यार्थवस्या साक्षात्प्रयोजनशून्य असस्यामुळे व्यय माहे. लक्ष्यार्थदृष्टया मात्र सावन भर बोध होत असतो ५७. वर्ग ५८-किरातराज सुरपूरे वैराग्य, सर्वसामादि पाया मांडण्यात केलेला