पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५७. मात समता बाणते ( दुःखवैषम्य जानें ). ज्ञानी जे करतो, खातो, देतो व हवन करतो ते त्याचे नव्हे. यास्तव पाहिजे तर तो तें करो किंवा सोडून देवो. कर्म किंवा भकर्म याचा त्याला काही उपयोग नाही. स्वरूप- स्थिति कळल्यामुळे तो सदा स्वरूपामध्येच स्थित असतो. पाषाणाला जशा मंजिया येत नाहीत त्याप्रमाणे त्यान्णपामून इच्छा उद्भवत नाहीत व जरी कदाचित् उद्भवल्या तरी त्या सर्व, जलतरगन्यायाने, आत्माच होत. हे सर्व तो व तोच हे सर्व आहे. जग व तो महात्मा यामध्ये अणुरेण- इतकाही भेद नाही. सर्व कार्य-कारण उपाधी साक्षिचिन्मात्र असल्यामुळे तो तत्त्ववेत्ता जगदधिष्ठान सन्मात्रच होय. तो परम पूर्ण व सर्वदोषशून्य परन्मामा पुरुषच आहे ५६. सर्ग५७-जिला आपला स्वभाव कळलेला नाही अशी चित् दृश्यरूप धरते. सर्व चित्रच आहे, दुसरे काही नाही श्रीवसिष्ठ-रघुनदना, आत्मम्प मियातील, चैतन्यबळानें, तिखट- पणाचे ज्ञान होणे हेच महतादि, घट-पटादि व देशकालादिरूप जग आहे. ( चैतन्याच्या अभेदसिद्धिमुळे प्राप्त होणारे हे फळ आहे.) आत्मलवणाच्या खारटपणाचे ज्ञान, आत्मरूप उसातील माधुर्यज्ञान, आत्मरूप पाषाणातील काठिन्यज्ञान व आत्मपर्वताचे जाड्यज्ञान हेच जग होय साराश आत्म्याम में विषयविषयीभावाने स्फुरण होणे हेच जगत्त्व होय. आत्मसत्तेचे सत्व, अंत- रात्मप्रकाशाचा स्वतः अवभास (ज्ञान), आत्मचद्राचें चिप चिद्रसायन. इत्यादिकाचा स्वतःच चित्प्रकाशामुळे अनुभव येणे हाच अहंकारादिकाचा उदय होय. परमात्मगुळामध्ये जे गोडपण असते त्याचा स्वात्म्यामध्येच अहकारा- दिकाच्या योगाने अनुभव येतो. परमात्ममणीचे में चित्त्वामुळे आपोआप अंतःस्फुरण तेच आपल्याला अह असे जाणते. पण राघवा, या मर्गात तं जाणते, स्वाद घेते, इत्यादि जो कर्म कर्तृ-निर्देश केला आहे तो मायिक जगदाकारानुभवाला स्वप्रकाश-आत्मानुभवमात्रत्व आहे, हे दाखविण्याकरिता केला आहे. खरोखरच त्यांचा भेद आहे, हे सांगण्याकरिता नव्हे. कारण वस्तुतः वेद्याचा असंभव असल्यामुळे ते आंत काही जाणत नाही; स्वाथाचा असंभव असल्यामुळे स्वाद घेत नाही, चेत्याचा असंभव अस- स्यामुळे कशाला चेतित करीत नाही व लभ्य वस्तूचा असंभव असल्या- मुळे ते कशाचा लाभ घेत नाही. तर ज्याच्यामध्ये मिथ्या जगदाकार