पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १६. वस्तुस्थिति आहे. यास्तव मातां तुला वाटेल तसे कर. सर्व भाव- पदातीत व सर्वभावात्मक अशा आत्म्याला जो सदा पहातो तो समा- हित होय. राग-द्वेष क्षीण झाल्यामुळे ज्याला सर्व भाव सम वाटतात त्याला समाहित ( समाधिस्थ ) म्हणतात. कारण त्याचे मन जसे झोपेत तसेच जागेपणीही हे दृश्य सत-आत्म्याच्या योगानें सत्च माहे, असे पहाते. बाजारांत जमलेले अनेक लोक आपापला व्यवहार बरोबर करीत असले तरी संबंध नसल्यामुळे उदासीन पुरुषाच्या दृष्टीने जसे ते सर्व असत त्याप्रमाणे संबंधाभावी ज्ञानाच्या दृष्टीने ग्रामही भरण्य होय. ज्याचें मन अतर्मुख आहे तो निजलेला, जागा अथवा जात येत मसला तरी मोठमोठ्या नगरांसही अरण्याप्रमाणे पहातो. नित्य अंतर्मुख स्थितीने रहाणान्या पुरुषाला, प्राण्यांनी भरलेल्या या जगाचा काही उपयोग नसल्यामुळे, सर्व आकाशतुल्य भासते. मन शीतळ झाले की सर्व जग शीतळ. पण तेच तृष्णेने तप्त झाले की सर्व जगास वणवा लागल्यासा- रखा होतो. कारण प्राण्यांच्या जे आत असतें तेच बाहेर दिसते. आकाश, पृथ्वी, वायु, अंतरिक्ष, पर्वत, नद्या, दिशा, इत्यादि सर्व अंतःकरणतत्वाचे जणुं काय फार दूर असलेले भागच आहेत. वडाच्या बीजांतील वृक्षाप्रमाणे अथवा सूर्योदयानंतर फुललेल्या कमळांतून पसरणान्या वासाप्रमाणे जे भांत असतें तेच बाहेर अनुभवास येते. (हे अध्यारोप दृष्टीने झाले. पण अपवाद- दृष्टीने पाहिल्यास ) भात किंवा बाहेर एका चैतन्यावाचून दुसरे काही नाही. तर मग जगाचा आकार भासतो कसा? म्हणून म्हणशील तर सांगतों-प्राग्वासनाबलात् प्राणी जशी कल्पना करतो तशाच वेषानें चित् तत्त्व उद्भवते. आत्मतत्त्वरूप जी भीतर बस्तु तीच बाह्यरूप होऊन जगत्तेने भासते. उपाधीप्रमाणे ती संकोच व विकास पावते. जगत्त्वाप्रमाणे अहंतारूपानेही आत्माच भासतो, हे खरे; पण वस्तुतः तद्रूप होत नाही. तर तो विभु ( त्या दोघांनाही व्यापून सन्मात्ररूपाने ) असतो. बाह्य व माम्यंतर असे दोन्ही प्रकारचे जग आत्म्याहून भिन्न केले म्हणजे भसत् होते. पण त्याला विचाराने पृथक् करी तो त्याचा बाह्य व आंतर भेद अबाधित असतो व त्याच्या ठायी अहं-मम-भध्यास झाल्यामुळे यांच्या भंगाचे पुष्कळ भय वाटते. सर्व वस्तुजात तापत्रयमय आहे, असे भासते. यास्तव जो भात भात्मरति असून बाहेर कमेंद्रियांच्या योगाने लिया