पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८८ बृहयोगवासिष्ठसार. असतानाही ज्याचे चित्त वासनाशून्य असतें तो बुद्ध , समाधिस्थच आहे. पुरुष व्यवहार करीत असो की वनात जाउन राहिलेला असो, तो सिद्धच होय. कथाश्रवण करावयास बसलेल्या मनुष्याचे चित्त कथेकडे नसून दुसऱ्याच कोठे गेले असल्यास तो जसा दूर गेल्यासारखाच होतो त्याप्रमाणे वासनाशून्य चित्त व्यवहारसमयीही भकत असते. जांथरुणावर झोप घेत निश्चल पडलेला पुरुष जसा स्वमांत खळम्यांत पडत असतो त्याप्रमाणे वासनापूर्ण चित्त काही करीत नसले तरी कर्तृ आहे. चित्ताचे अकर्तृत्व हेच उत्तम समाधान होय. सोच केवलभाग व तीच शुभ व श्रेष्ठ शाति होय. ध्यान व अध्यान याचें परम कारण चित्त आहे. यास्तव त्यालाच अकुररहित कर. वासनाशून्य मन स्थिर होते व तेच व्यान होय. ज्याच्या वासना क्षीण होऊ लागल्या आहेत तेच चित्त श्रेष्ठ पदी जाण्यास उद्यत झाले आहे असे म्हण. तात यास्तव बा उद्योगप्रिय रामा, दुःखद वासनेस क्षीण करावें. ज्याच्या योगाने भात्मा स्वस्थ, जगदास्थाशून्य व शोक-भय-इच्छारहित होतो तोच समाधि होय. रामभद्रा, सर्व पदार्थांविषयींचा अह-ममाप्यास सोडून गृहामध्ये, पर्वतावर किंवा आणखी कोठे तुला जसे रहावयाचे असेल तसा रहा. ज्याचा अहकारदोष शात व चित्त समाहित झाले आहे अशा गृहस्थाचे गृहप निर्जन वनभूमी आहेत. ज्याची मनोदृष्टि समाहित झाली आहे अशा नित्य अपरोक्ष प्रत्यगात्म्यामध्ये स्थित असलेल्या प्राण्याना अरण्य व गृह ही दोन्ही सारखीच भासतात. शातचित्त पुरुषाला गजबजलेली नगरेही शून्य वनासारखी वाटतात व वृसियुक्त चित्ताने मत्त झालेल्या प्राज्ञ पुरुषाला निर्जन वनेही मोठ्या नगराप्रमाणे दुःखद होतात. विक्षिप्तचित्त संसार देते व शातचित्त मोक्ष देते, अशी संस्कृनांत समाधिशद पुलिंगी माहे २ गृहमेव गृहस्थाना मुममाहितचेतमाम । शान्ताहानिदोषाणां बिजना बन- भूमयः । याच अर्थाचा-बनेऽपि दोषा प्रभवन्ति रागिणा गृहऽपि पंचेन्द्रियनिग्रह तप. । अकुस्मिते कर्मणि य प्रवर्तते निवृतरागस्य एहं तपोषनं हा लोक हितोपदेशांत आहे. याचा सारांश-बनामध्येही रागी पुरुषांच्या हातून दोष संभवतात । गृहामध्येही पंचंद्रियसंयम तप माहे. भनियमांमध्ये प्रवृत्त होणाऱ्या रागरहित पुरुषाचे गृहन तवन माहे.