पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५६. ७८७ व रात्री नवीं नवीं विचित्र भूपणे घालूत नृत्य करणाऱ्या चामुंडा नांवाच्या मातेने ते ब्राह्मणाचे शुष्क शरीर आपल्या मुकुटांत घातले. ज्याचा मूढदृष्टि लोकानी कल्पिलेला मासादिमय देहही त्रिजगद्वंद्य देवीच्या शिरोभूषणतेस प्राप्त झाला तो महात्मा स्वतः सर्वोत्कृष्ट पदास प्राप्त झाला हे काय सागावें ! राघवा, अशा प्रकारच्या या उद्दालकाच्या विदेह कैवल्यप्राप्तीपर्यंत सर्व चरित्राचे चिंतन मोठ्या आदराने व सतत जो करतो तो पुरुष तापत्रयानी भरलेल्या व्यवहार-भरण्यात विहार करीत असतानाही सत्य, शाति, दम, संतोष इत्यादि सद्गुणापासून वियुक्त होत नाही व शेवटी त्याला मोक्षफल अवश्य मिळते ९५. सर्ग ५६-मायातिमिर घालवृन प्रबुद्ध व वासनाशुन्य झालेला पुरुष व्यवहार करीत असला तरी समाधिस्थच होय. श्रीवसिष्ठ-कमलनयना, या क्रमाने विहार करीत व आपणच आपल्याशी विचार करून तु विततपदी विश्रात हो. शास्त्रश्रवण, तत्त्वपरीक्षण, गुरुवच- नावर विश्वास व स्वचित्तशोधन यान्या योगाने सर्व दृश्याचा बाव होऊन परम पदी विश्राति मिळेपर्यत विचार अवश्य करावा. वैराग्याभ्यास, शास्त्र- श्रवण, तत्त्वपरीक्षण, प्रज्ञा व गुरुप्रोक्त क्रम, याच्या योगाने अथवा एका प्रज्ञेनेच पुण्य पद मिळते. उत्तम बोधवती तीक्ष्ण व कलंकरहित मति इतर सर्व सामग्रीने रहित असली तरी शाश्वत पदास पोचते. श्रीराम-भगवान् , कोणी ज्ञानी व्यवहारपरायण असूनही समाधिस्था- प्रमाणे विश्रात होतो व दुसरा कोणी समावि लावून स्वस्थ बसलेला असतो, तेव्हा या दोघापैकी श्रेष्ठ कोण ? ते मला सागा, श्रीवसिष्ठ--रामा, या सर्व गुणसमाहारास अनात्मरूपाने पहाणाऱ्या परुषाची अंतःशीतलता हीच समाधि होय. मन असले म्हणजे विक्षेप उत्पन्न करणारा दृश्यसबंध होतो. पण माझें मनच नाही, असा निश्चय करून शीतल झालेला कोणी व्यवहार करतो व कोणी ध्यानामध्ये व्यवस्थित असतो. हे रामा, हे दोघेही आत शीतळ असल्यास सुखीच होत. अंत:- शीतलता हे अनंत तपाचे फळ आहे. पण समाधिस्थानी बसूनही ज्याचे चिच वृत्तींच्या योगाने चंचल होते त्याचे ते समाधान म्हणजे उन्मचाचे खंडवच होय. त्याचप्रमाणे शरीरद्वारा उन्मतासारखें ताडवनृत्य करीत