पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८४ बृहद्योगवासिष्ठसार. मपर्ण होऊन राहिले. ज्याने स्वर्गाच्या ऐश्वर्याचा अनुभव घेतला आहे त्या परुषाला भलोकच्या ऐश्वयोची जशी इच्छा होत नाही त्याप्रमाणे एक क्षणभरही त्या स्थितीत स्थिर झालेल्या मनाची रति भोगामध्ये होत नाही. अशा प्रकारचा आनद हेच शाश्वत व कल्याणकर श्रेय आहे. तेथे विश्राति पावलेल्या मनाला पुनः भ्रम होत नाही. कुबेराच्या चैत्ररथ वनात विहार करणारा मनुष्य खदिराच्या वनात जसा कधीही येत नाही त्याप्रमाणे त्या परमानंदास प्राप्त झालेला साधु दृश्याकडे ढकूनही पहात नाही. राजे दीनतेस जसे फारसे जुमानीत नाहीत त्याप्रमाणे या महा-आनदपदवीस प्राप्त झाल्यावर साधू दृश्यास फारमा मान देत नाहीत. सहाव्या भूमिकेस पोचलेले बुद्ध चित्त दुमन्यांच्या मोठ्या प्रयत्नानेंच व्युन्धान पावते. पण सातव्या भूमीत रूढ झालेले तें दुसन्याच्या प्रयत्नानेही समाधि मोडीत नाही. __ असो, राघवा, उद्दालक महा महिने सर्व सिद्धीम सोडून त्या अवस्थेत राहिला व न्यानतर चैत्रात बुक्यातून पार पडणान्या सूर्याप्रमाणे सावध झाला. पण त्याबरोबर त्याला पूर्वी दिसलेल्याच आसरा, मिद्ध इत्यादिकांच्या विमानपरपरा पुनः दृष्टी पडल्या. दांच्या योगाने ज्याचे तळहात पवित्र झाले आहेत अशा आम्हा मुनीम व विद्यावरीसह विद्यारास त्याने पाहिले. ते सर्व त्या उद्दालक महामुनीस म्हणाले, " भगवन् , प्रगाम कर- णान्या आमच्याकडे कृपादृष्टीने पहा. या विमानात आरूढ होऊन स्वर्गास चल जगातील सर्व संभोग-सपत्तींची पराकाष्ठा स्वर्गच आहे. हे विभो, तये आनंदाने राहन कल्पपर्यत उचित व इष्ट विषयाचा भोग घे. स्वर्गादि फल भोगाकरिताच सर्व तप क्रिया आहेत. त्या पहा हार व चामरे धारण करणान्या विद्याचराच्या अगना तुझी उपासना करावयास तयार झाल्या आहेत. धर्म व अर्थ याचे सार काम आहे. कारण तेच त्यांचे फल भआहे. सुदर स्त्रिया हे कामाचे फल आहे. पण त्या, वसंत ऋतूंतच येणान्या मजिन्याप्रमाणे, स्वातच रहातात." रघुकुलभूषणा, याप्रमाणे मनास लोभ उत्पन्न करणान्या त्या सर्यास अतिथी समजन त्याने त्याची पूजा केटी तो महात्मा तसाच स्तन्ध राहिला. त्या धीराने त्या विभूतीचे अभिनंदन केले नाही व त्यागही केला नाही. नुस्ते 'अहो सिद्धांनो, तुम्ही जा' एवढेच बोलुन तो आपल्या समाधीत तत्पर झाला. नंतर भोगाविषयी विरत चालेल्या व स्वधर्मामध्ये