पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७.१ २. मुमुक्षुब्यवहारप्रकरण-सर्ग १२. चार मोक्षद्वारातील द्वारपाल आहेत. त्यांचे मोठ्या प्रयत्नाने सवेन करावे म्हणजे ले मोक्षरूपी राजगृहाचे द्वार . उघडतात. प्राणाकडेही-नमहात यातील एकाचा तरी आश्रय न करणे यासारखे पाप नाही या चार द्वार- पालांतील एक मरी वश झाला तरी हळु हळु इतर वश होण्याचा संभव असतो. विवेकी-पुरुष शास्त्रार्थ श्रवण व मनन यास योग्य होतो तो सर्वात श्रेष्ठ आहे, असे व्यवहारातही मानितात. अविवेक्याची मति उत्तरोत्तर मद होऊ लागते व त्यास कोणी मान देत नाहीत, हे जगप्रसिद्ध आहे. यास्तव शास्त्र व सज्जन यांचा समागम, तप, दम, इत्यादिकान्या योगाने अगोदर शुद्ध बुद्धि वाढवावी. चित्ताचे जाड्य घालविण्यास हेच उत्तम उपाय आहेत. श्रद्धेने शास्त्रावलोकन करणे यासारिखें तर बुद्धि, शुद्ध व वृद्धिंगत होण्यास औषधच नाही ससार हा विषवृक्ष आहे. सर्व दुःखाचा साठा आहे. यास्तव मौयास नाहीसे करून टाकण्यास विलब लावू नये. दुराशाच्या योगाने चित्त संकुचित होते. यास्तव त्याचा त्याग करावा ११. सर्ग १२---या सर्गात, ससारगतीची अनर्थता, ज्ञानाचे उत्तम माहात्म्य, व रामाच्य __ठायीं असलेली पृच्छकाच्या गुणाची समृद्धि याचे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ-चित्तातील रजोगुण व तमोगुण पुरुपाम श्रेयोमार्गापासून हट- वीत असतात यास्तव शुद्ध सात्त्विक वृत्ति धारण करून ज्ञान सपादन करावे. ब्रह्मसज्ञक परमपदाचा साक्षात्कार झाला असता सर्वत्र शातिच शाति अनुभवास येते. या विज्ञानाच्या योगाने चित्तास विश्राति जर मिळाली नसती तर साधूस या ससारातील अनिष्ट परिणाम कसे सहन करिता आले असते? या आत्म्याच्या साक्षात्कारामुळे सर्व मननवृत्ति नष्ट होतात. रामा, या ससारविषाच्या वेदना असह्य आहेत त्यास कमी (मह्य ) करणारा, योग ( चित्तैकाथ्य ) हाच पवित्र मंत्र आहे. पण तो सजनाबरोबर शास्त्रविचार केल्यावाचून प्राप्त होत नाही. शास्त्रीय पद्धतीने विचार केला अमता सर्व दुःखाचा क्षय अवश्य होतो. सप आपल्या शरीरावरील कात टाकून जसा नवा बनतो त्याप्रमाणे विवेकी पुरुष या आधिव्याधियुक्त शरीरास टाकून, ह्मणजे "ते माझे आहे" असे न समजता, मी त्याच्याहून अगदी निराळा व विलक्षण आहे, असे जाणून दुःखरहित व शातचित्त होतो. गारुड्याच्या खेळातील वस्तूप्रमाणे ह्या मायिक जगाकडे