पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५१. ७८३ मुनि त्याला बाह्य आकारापासून परतवू लागला. पण ध्यानादिकांचा पुष्कळ अभ्यास झालेला असल्यामुळे व आनंदाचा स्वादही कळलेला असल्यामुळे तें मध्येच चिन्मय सविकल्प समाधीस प्राप्त झाले आणि त्याच क्रमानें त्या साधकाने पुढे अभ्यास चालविला असता निरिंधन अग्नीप्रमाणे चित्त स्वतःच चित्ततेस सोडून चिद्रप झाले. पूर्व अवस्थेहून निराळी अवस्था त्याला प्राप्त झाली. एकाद्या मातीच्या घागरीत गढुळ पाणी भरून ठेवले असता काही दिवसांनी त्यातील जलांश सुकून जाऊन चिखल जसा घागरीला चिकटून बसतो व कुंभरूप बनतो त्याप्रमाणे त्याचे शुष्क मन तत्त्वमय झाले. याप्रमाणे चित्ताचा चित्त भाव गेला असता त्यातील चित्प्रतिबिंबही विबभूत सर्व- सामान्य शुद्ध चित् झाली. त्यानतर उद्दालक तशा प्रकारच्या बोधास प्राप्त होऊन स्वतः चिदधिष्टानभूत, द्वैतप्रतिभासरहित, शुद्ध व महत् चिदाकाश झाला. त्या अवस्थेत दृश्यदर्शनशून्य, अनंत, ब्रह्मादिकाकडूनही स्वाद घेतला जाणारा, व सर्व विषयसुखकणाचा जणु काय आधारभूत सागरच अशा भानदास तो प्राप्त झाला. शरीरापासून अगदी पृथक् झालेल्या त्याला काही अवर्णनीय शुद्धि प्राप्त झाली. तो सत्तासामान्यरूप आनदसागर झाला. तो चेतन हस आनदसरोवरात यथेच्छ विहार करूं लागला. निर्मल हृदाका. शांत तो कलापूर्ण चद्राप्रमाणे होऊन राहिला. तो चित्रासारखा, निर्वात दीपासारखा, तरगरहित जलाशयासारखा अथवा सर्व जलाचा वर्षाव केल्यामुळे गर्जना न करणा-या मेघासारखा होऊन राहिला. त्या महाप्रकाशात फार वेळ राहिलेल्या उद्दालकानें आकाशांतून गमन करणाऱ्या अनेक सिद्धास व पुष्कळ अमरासही पाहिले. इंद्र, सूर्य इत्यादि- काचे अधिकार देणाऱ्या व अप्सरागणानी भरलेल्या अनेक विचित्र सिद्धी चोहीकडून त्याच्याकडे आल्या. पण एकादा पोक्त व गभीरमति पुरुष जसा बाळलीलेस फारसा मान देत नाही त्याप्रमाणे त्या द्विजाने त्याचा आदर केला नाही. सर्व सिद्धीना कस्पटाप्रमाणे तुच्छ समजून याप्रमाणे तो सहा महिने त्या आनदमदिरात राहिला. तो द्विज सातव्या भूमिकेपर्यत उत्तरो- तर उत्कृष्ट पदास प्राप्त होई तो सिद्धादिक सर्व तेथे राहिले. पण विषय. बद्धीने त्या आनदाचा स्वाद न घेतल्यामुळे तो महात्मा अनानंदपदास पोचला. त्यामुळे त्याचे आत्मचैतन्य विषयी पुरुषाप्रमाणे क्षुद्र आनंदात आसक्त झाले नाही व दुःखांतही निमग्न झाले नाही. तर स्वप्रकाशैकर-