पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८१ बृहद्योगवासिष्ठसार. त्याने इंद्रियांस विषयांपासून दूर केलें व कांसव आपले अवयष जसे झाकून घेतो त्याप्रमाणे त्याने त्यांस आंतल्या आंतच झाकून ठेवलें. बाह्य स्पर्शीस त्याने दूर टाकलें व आतर वासनांस अधिष्ठानतत्त्वात आकर्षण करून घेतले. नवद्वारांस बंद केले. मान सारखी धरली व युक्तीने वश केलेल्या हत्तीप्रमाणे वश झालेल्या मनाला त्याने हृदयांतून बाहेर पडूं दिले नाही. त्याकारणाने अतिनिर्मल सौम्यतेस प्राप्त झालेल्या त्याला वातरहित पूर्ण. सागराची शोभा प्राप्त झाली. मशकास जसा वायू उडवून सोडतो त्याप्र- माणे त्याने सर्व विकल्पास दूर उडवून सोडलें. जसा एकादा शूर खजाने रणांत शत्रंस तोडतो त्याप्रमाणे वारवार उठणान्या सकल्पास त्याने यथेच्छ कापून काढले. विकल्पौष नाहीसा होतांच हृदयाकाशात त्याने तमोगुणप्रयुक्त अध. काराने आच्छादित झालेल्या विवेकसूर्यास पाहिले. पण प्रयत्नशील पुरुषांना असली विप्नं फार वेळ प्रतिबध करूं शकत नाहीत. त्या धीराने तत्काल आपला सत्त्वगुण वाढविला व त्यामुळे प्रदीप्त झालेल्या ज्ञानमय मनो. सुर्यान त्यास हटक्लि. तेव्हा रात्रीचा अधकार लोपला असता कमल उदय पावणाऱ्या सूर्याने युक्त असलेल्या प्रातःसंध्येम जसें पहाते त्याप्र- माणे त्याने तम शात झाले असता मुदर तेज:पुज पाहिला. पण त्या शूराने अधिष्ठानतत्व-दर्शनाने त्याला बाधित केले. तहां रज व समा- धान या दोघांपासून चाळविलेले चित्त विषयच न मिळाल्यामुळे लीन झाले ( तें निद्रेत मग्न झालें ). पण वायु मेघपक्कीम, हत्ती कमालनीस अथवा सूर्य रात्रीस जमा क्षीण करून सोडतो त्याप्रमाणे त्याने चित्ताला जागे करून निद्रा घालविली. नतर त्याच्या मनाने नाना वामना- परिकल्पितरू-पयुक्त आकाशाची भावना केली. तव्हा उद्दालकानें त्याचेही परिमार्जन के पण आकाशमवित् नाहीशी झाली असता याचें मन मृट झाले. तथापि या महा प्रयत्नशाली पुरुषाने त्या मोहाचेही परिमार्जन केले. तेव्हा शेवटी हे रामभद्रा ( तेज, तम, निद्रा, व मोह यांचा परिहार केला अमना ) त्याचे मन काही विलक्षण अवस्थेस प्राप्त होऊन क्षणमर विश्राम पावले. पण नियतीने या दुर्भाग्याला तेथें फार वेळ टिकू दिले नाही. पाण्याचा मोघ पढे प्रतिबंध झाला असता जसा मागे वळतो त्याप्रमाणे ते थोडा वेळ विश्राति घेऊन पुनः बाह्य प्रपंचाकडे वळले. पण त्यामुळे कंटाळून प्रयरन न सोडता उद्दालक-महा-