पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ५४. लेला प्राण घरटें सोडलेल्या पक्ष्याप्रमाणे ब्रह्मभावनेने व्यक्त झालेल्या व हृदयगत रसाने भरलेल्या बाह्य आकाशात राहिला. नंतर भावनेनेंच दीप्त झालेल्या हृदयानीने त्याच्या सर्व शरीरास जाळले. प्रणवाच्या अकार- रूप प्रथम अशामध्येच हे सर्व भावनेने झाले. हठाने नव्हे. बलात्का- राने प्राणांचे नियमन करूं लागले असता मरण-मूर्छादि-जन्य दुःख भोगण्याचा प्रसंग येतो. प्रणवाचा दुसरा अंश उकार. त्याचा अनु. दात्त व मंद्र उच्चार करताना कुभक-नावाचा प्राणायाम होतो. एकाद्या भांड्यात अडवून ठेवलेल्या पाण्याप्रमाणे कुंभकसमयीं प्राण बाहेर, आत, खाली, वर, पुढे, मागे व बाजूस जात नाही. तर स्थिर रहातो. असो; ज्याने देहनगरास जाळले आहे असा अग्नि विजेच्या ज्योती- प्रमाणे क्षणांत शांत झाला व शरीराचें पाढरे भस्म दिसू लागले. त्या अवस्थेत शरीराची हाडे कापुराच्या धुळीने रचलेल्या शय्येवर निज- ल्याप्रमाणे भावनादृष्टीने दिसत होती. वायूने भस्मासह त्यास वर उडविलें व त्यामुळे ती शरत्कालच्या अभ्राप्रमाणे कोठे दिसेनाशी झाली. प्रण- वाच्या दुसऱ्या क्रमात भावनामय योगानेच हे इतकें झालें. नतर त्याच्या तिसऱ्या क्रमात म्हणजे मकारोच्चारसमयीं पूरकप्राणायाम झाला. यावेळी प्राण चेतनामृतामध्ये राहिले. ते रसायनमय धारारूप झाले. त्यानी सर्व शरीरास भरून सोडले. त्यामुळे उद्दालकाचे ते आनंदप्रधानशरीर नारायण- मय झाले. चक्राकार भोंवन्यानी वहाणाऱ्या गगेला जसे मेघ आपल्या जलाने भरतात त्याप्रमाणे प्राणानी कुडलिनीस भरून सोडले, त्यामुळे ब्राह्मणाचे ते शरीर समाधिकार्यस्थ झाले. ___ नतर पद्मासनबंधाने बसून व पंच-इद्रियास दृढ बाधून तो निर्वि- कल्प समाधीकरितां व्यवसाय करूं लागला. स्वतःच्या मनास स्वच्छ कर- ण्याकरिता त्याने प्रयत्न चालविला. प्राणायामाच्या अभ्यासाने त्याने प्राणादि वायूस शात केलें व एकाद्या पशूस जसें दाव्याला बांधून ठेवितात त्याप्र- माणे त्याने मनाला हृदयांतच स्थिर केलें. दगडी बाध जसा पाण्याला अडवून धरतो त्याप्रमाणे क्षुदविषयांकडे धावणाऱ्या चित्ताला विवेकाने शुद्ध करून अडवून धरले. संध्याकाळच्या कमलाप्रमाणे नेत्र अर्धे मिदन त्यांतील तारा निश्चल ठेवली. मौन धारण करून त्याने प्राणापानांचा वेग सौम्य केला. तिळांतील तेल बसें प्रयत्नाने प्रथक् करतात त्याप्रमाण