पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वृस्योगवासिष्ठसार पक्ष्यानी परिपूर्ण, नानाप्रकारप्या वेलानी संपम, पनेचर प्राण्यांनी भरलेले, भाणि कचित् महारत्नानी, कचित चंचल कमलांनी व कचित् स्वच्छ सरो- पररूपी महा दर्पणानी सुशोभित झाले होते. त्या गंधमादन-स्थळाच्या एका उंच व देवदारुवृक्षांनी भरलेल्या शिखरावर एका सर्वतः पुष्पित छाया- प्रधान वृक्षाखाली उबालक नावाचा एक मौनी, मी अवश्य पुरुषार्थ संपादन करीन अशा अभिमानाने युक्त असलेला, प्रमाणकुशल, उदार- चित्त व ज्यास तारुण्य प्राप्त झालेले नाही असा उद्दाम तापसी पूर्वी रहात असे. प्रथमतः तो अल्पज्ञ, विचारशून्य, पण शुभाशय होता. पण पुढे तो जसा जसा तप व शास्त्रार्थविचार करू लागला तसा तसा त्याला शुभ विचार सुचू लागला. एकदा एकानात बमलेला तो शुभ चित्ताने या ससार-व्याधीविषयी असा विचार करू लागला.- ज्याची प्राप्ति झाली असता पुनः शोक करण्याचा प्रसग येत नाही, असे या जगात कोणते बरे मुग्न्य प्राप्य आहे ? पुनरपि जन्मसवध होणार नाही, असेच ते प्राप्य असले पाहिजे. मेरुगंगावर जसा मेघ त्याप्रमाणे मी. मननशून्य परम पावन पदी केव्हा बरें निश्चल विश्राति घेत राहीन ? माझ्या भोगतृष्णा केव्हा बरें शान होतील ? परम पदी विश्राति घेणान्या मनाने हे करून मला हे कर्तव्य आहे' ही कल्पना मी केन्हा बरें सोडीन ८ विकल्पजाल माझ्या मनाला स्पर्श करीत नाही, असे केव्हा होईल. मी या मत्त तृष्णानदीतून विवेकबुद्धिम्प नावनें केव्हा पार होईन ? चित्तनाश झाल्यामुळे मी शान, मनुष्ट, निम्पृह, केवल साक्षी- प्रमाणे जगञ्चमत्कार पहाणारा व मर्व चिन्मात्र आहे, अशी भावना कर. णारा केव्हा होईन ? शातस्वरूप व परदृष्टि याचा लाभ मला कधी होणार ? अभ्यासवशात् प्राप्त होणाऱ्या चित्प्रकाशाच्या योगाने मी फार दूरवर केव्हा पाहू शकेन' ही काळोखी दोपरात्र कधी सपणार! ज्याचे मनन शात झाले आहे, असा मी गिरिगुहेत बसून निर्विकल्प समाधीने शिलेसारखा कधी होईन. निरश आत्म्याच्या न्यानामध्ये विश्राति घेत राहिलेल्या व त्यामुळेच मौनव्रत धारण करणान्या माझ्या मस्तकावर पक्षी गवताची घरटी कधी बाधतील ? दगडाप्रमाणे निश्चल झालेल्या माझ्या हृदयावर व खाद्या- वर बसून पक्षी विश्राति कधी घेतील ? तृष्णा, जन्म यांसारख्या काटन्या वृक्षानी व वेलीनी भरलेल्या या ससार-अरण्यांतून मी पार कधी पडेन !