पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६८ बृहद्योगवासिष्ठसार. रागादि मलाचे प्रतिक्षणी निरसन करीत मनाला निर्मल ठेव. आशापाशास पूर्णपणे तोडून स्वात्मपरायण हो. हे सर्व मीच आहे, अशी भावना ठेवून सत्तारूप हो. आत्मता व परता सोडून जगस्थितींत विभाग न पहाता वजस्तभासारख्या दृढ आत्म्याचा आश्रय धर. उदार व धैर्ययुक्त बुद्धीने आशारूपी मानस पाशास तोडता येते. स्थिर चित्ताने तत्त्वाचा आस्वाद घेणान्या पुरुषास विषही अमृततुल्य होते. निर्मल व निरश आत्मस्वरू- पाला विसरताच ससारकारणभूत महामोह उद्भवतो व त्याच आत्म्याचे स्थिर व्यान केले म्हणजे तो क्षीण होतो. आशा-महार्णवाचे उल्लंघन करून स्वरूपास प्राप्त झालेल्या तुझी सवित् सूर्यकिरणाप्रमाणे सर्वतः पसरेल. आनदाद्वय भात्म्याचा स्वभाव पहाणाऱ्या पुरुषाला गोड रसायनही विषा- सारखे कडु लागत. जे आत्मस्वभावास प्राप्त झाले आहेत त्यान्याशी आजी मैत्री करतो. बाकीचे, पुरुषार्थोपयोगी पौरुपहीन असल्यामुळे, नावाचेच पुरुष आहेत अशा लोकाचे दर्शनही न घेता उपेक्षाच करावी. सिद्ध तत्त्वज्ञाच्या अपेक्षेने साधक अवस्थेत असलेले योगी व उपासकही न्यून होत. भान्म- ज्ञाना आत्मज्ञानामुळेच उन्नत अवस्था प्राप्त झालेली असते. भात्मदृष्टीने युक्त असलेल्या त्याच्यावर सूर्यादि दुसरी कोणतीही जें उपकार करूं शकत नाहीत; इतकेच नव्हे तर भरदुपारी लावलेल्या दिव्याप्रमाणे ती सर्व त्याच्या पुढे निस्तेज होतात. आत्मज्ञ पुरुष सर्वापेक्षा जसा भति उन्नत तसाच अनात्मज्ञ सर्वोहून अति तुन्छ होय. अनात्मज्ञ इष्ट पदार्थाच्या प्राप्तीकरिता जरी प्रयत्न करीत असला तरी शवच होय. चित्त पुष्ट झाले की आत्मज्ञता दूर पळते. यास्तव विषयसेवनाचा तिरस्कार करून मनाला कृश करायें. अनात्म्याचे ठायी आत्मभाव ठेव- ल्याने, केवल देहाच्या आस्थेनें व पुत्र, त्री आणि कुटुब यान्या योगाने चित्त पुष्ट होत असते. अहंकार, ममता, हे माझे अशी भावना, जरा मरण- दुःख, उन्नतीची व्यर्थ इच्छा, राग-लोभादि दोष, आधि-व्याधि-विलास, संसारावरील विश्वास, मेह, धनलोभ, रत्ने व स्त्रिया याचा लाभ इत्यादि- काच्या योगाने चित्त पुष्ट होते. यास्तव राघवा, तू या सर्व दोषांचा परिहार करून विचाररूपी तीक्ष्ण शस्त्राने चित्त-विषवृक्षास बलात्काराने तोडून टाक शरीररूपी भरण्यांतील या चिताख्य पुष्ट गजाला हे राधव- सिंहा, तूं मापल्या विवेकयुक्त बुद्धिहस्ताच्या नखानी फाडून टाक. त्या