पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १.. वश करून घे. कुंभामध्ये जसे कुंभाकाश त्याप्रमाणे चित्तामध्ये संसार असतो. यास्तव कुंभाचा नाश झाल्यावर कुंभाकाश जसे आपोमाप नाहीसे होते त्याप्रमाणे चित्तक्षय झाल्यावर संसार नाहीसा होतो. भूत व भविष्यत् विषयानुसंधानाचा त्याग केला व वर्तमान विषयांशीही अनासक्त चित्ताने व्यवहार केला म्हणजे चित्त क्रमानें क्षीण होते. संकल्पानुसंधा- नाचें वर्जन जर तूं प्रतिक्षणी करशील तर पवित्र अचित्तत्वास हां हा म्हणतां प्राप्त होशील. मेघविस्तार असेपर्यंत आकाशजलाचा जसा संभव असतो त्याप्रमाणे सफल्प असत तों चित्तविभूति. ते गेले की चित्त- विभूति संपली. पण चिदात्मरूप चित्तयुक्त असेपर्यंत संकल्पांचा क्षय होणे अगदी अशक्य आहे. चिदात्मा चित्त-रहित झाला की संसार समूल जळलाच म्हणून समजावें. चित्तशून्य चेतन म्हणजे प्रत्यगात्मरूपच होय. त्याच्यामध्ये मनाचा गधही रहात नसल्यामुळे पुनः संकल्प उठत नाही. चित्तशून्य अवस्था हीच सत्यता, शिवता, परमार्थता, सर्वज्ञता व परमार्थ दृष्टि होय. श्मशानात जसे कावळे त्याप्रमाणे जेथें मन तेथे भाशा, दुःख व विषय-सुखें सदा तयार असतात. विद्वानाचेही मन असते. पण त्यांतील वासनाबीज तत्त्वज्ञानाने बाधित झालेले असते. शास्त्र, सजन-सपर्क, व सतत अभ्यास याच्या योगाने जगातील भावांचे अवस्तुत्व ज्ञात होते. पुरुषयत्न व मी या जन्मी अवश्य ज्ञान संपादन करीन, असा निश्चय यांच्या योगाने चित्ताला अविवेकापासन निवृत्त करून बलात्काराने शास्त्र व सत्पुरुषसमागम यात नियुक्त करावें. भगाध जलांत पडलेले रत्न दुसऱ्या रत्नाच्या प्रकाशानेच जसें पहातात त्याप्रमाणे परमात्म-दर्शनाचे मुख्य कारण स्वयंज्योति प्रत्यगात्माच होय. स्वतः अनुभविलेली दुःखे पुरुष स्वतःच टाकण्याची इच्छा करितो. यास्तव आत्माच आत्मविज्ञानाचा मुख्य हेतु माहे. याकरिता तूं सदा तत्परायण हो. कोणतीही क्रिया करीत असतांना, उत्पत्तिसमयी, जीवित. काली व मरणप्रसंगीही तू ज्ञानमात्र निर्मल आत्म्यामध्ये स्थिर हो. हे मारें वहा मी ही वासना सोड, व एकनिष्ठतेने सवित्परायण हो. बाल्यादि वर्तमान स्थिति व यौवन-राज्यादि भविष्यत् अवस्था यांमध्ये तू यावजीव एकबुद्धि होऊन आत्मध्यान व समाधि यांत तत्पर रहा. बाल्यादि दशेतील सुखें व दुःखें भाणि जामदादि अवस्था यांमध्ये सतत भात्मपरायण हो.