पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होगवासिता पारस होणान्या पक्षाप्रमाणे विकणय राम्प-संपम झाला. भ्रमशून्य होऊन माने देवाच्या अपक-भावदर्शनरूप अयुक्त चेष्टिताची निंदा केली वण्याचे चित करणेने आई झाले आहे, असा तो साधु चित्तनियमाचा जम्यास करण्याकरिता, मेघ विश्रांतीकरिता जसा पर्वतशिखरावर जातो त्याप्रमाणे, अभ्यमूक पर्वतावर गेला. तेथे त्याने सर्व संकल्प सोडून दहा वर्षे उत्तम तप केले. त्यामुळे तो भात्मज्ञानी झाला. मापल्या नित्य सन्चेस प्राप्त झालेला तो महात्मा भय व शोक यानी रहित झाला. त्याचे चित्त अगदी शात झाले. त्याचे जीवन्मुक्तस्वरूप उदय पावलें व चंद्राप्रमाणे तो पूर्णचित्त गाधि सर्वोस आहाद देऊ लागला ४९. सर्ग ५०-चित्तजयाचे उपाय, नानमाहात्म्य व चित्तसांच्या पुष्टीचे हेतू श्रीवसिष्ठ-रघुवीरा, याप्रमाणे ही महामाया पसरली आहे. दोन घटिका झालेला स्वप्नभ्रम कोठे व अनेक वर्षे टिकणारी श्वपचता व राजता कोठे ! भ्रमाने पहाणे कोटें व प्रत्यक्ष दिसणे कोटें ! असत्यत्व व मसदि- ग्धत्व कोठे आणि सत्यपरिणामिता कोठें एवढ्यासाठीच हे महाबाहो, मी नेहमी सांगत असतों की ही महामाया भति कठिण आहे व ती ज्याचे मन असावध असते त्याला सकटात पाडते. श्रीराम-पण, विप्रवर्य, सर्व अगास आतून तोडणाऱ्या व वेगाने फिरत रहाणान्या या मायाचक्राचा निरोध कसा करिता येईल ! श्रीवसिष्ठ-या भ्रमण करणान्या व भ्रमात पाडणान्या ससाररूप मायाचक्राची नाभि चित्त आहे. यास्तव निक्षयात्मक बुद्धीने व मोठ्या यत्नाने त्याला घट्ट धरून ठेवले म्हणजे मायाचक्र थावते. लहान मुलें पित. ळेच्या किंवा लोखडी चाकाला दोराबाधून व त्याला पीळ घालून गरगर फिरवितात. पण तो दोराच घट्ट धरून ठेवल्यावर जसे ते फिरेनासे होते त्याप्रमाणे चित्तम्पी नाभीला प्रतिबंध केला की चाकाची गति बद पडते. रामा, तूं चक्रयुद्धात फार निष्णात आहेस. तेव्हा त्याच्या भ्रमणादिका- विषयी तुला अधिक काही सांगण्याची गरजच नाही. यास्तव चित्ताला प्रतिबंध कर. या युक्तीवाचून दुःखक्षय होणे शक्य नाही व हिचा माश्रय केल्यावर तें एक क्षणभरही टिकत नाही. हे रामबाण भौषध न घेतस्यास मोठ्या प्रयत्नानेही संसारमहारोग शांत होत नाही. पास्तव मा सच्छिष्या, तीर्थ, दान, तपःक्रिया इत्यादि सर्व टाकून तं परम कल्याणाकरिता चित्ताला