पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

०६९ ५ उपशमप्रकरण-सर्ग ४९. व शेवटी अग्नीत पडून मेला. त्यानंतर काही कालाने तीच स्थिति सकस्पदोषामुळे जलांत असलेल्या तुझ्या चिचात प्रकट झाली. एकादे वेळी अनुभविलेल्या गोष्टीलाही जसा द्रष्टा अगदी विसरतो त्याप्रमाणे कदाचित न पाहिलेली स्थितिही चित्त साक्षात् अनुभविल्याप्रमाणे पहाते. मनोराज्य, पित्तादिकाचा प्रकोप इत्यादि कारणानी जामत्कालीही मनाला अनेक भ्रम दिसतात. स्वप्नाविषयीं तर बोलावयासच नको. त्रिकालज्ञानी योगी भविष्य- त्काली घडणारी गोष्टही भूतकाळी झाल्यासारखी जशी पहातात त्याप्रमाणे गाधे, मागे घडलेलें कटंजचरितही तुला वर्तमानाप्रमाणे भासणे अगदी शक्य आहे. पण 'मीच तो' असा भलताच भ्रम का झाला म्हणून जर म्हणशील तर त्याचेही कारण सागतो. बाबारे, सर्व अनात्मज्ञ पुरुष आत्मभिन्न देह- पुत्र-कलत्रादिकामध्ये 'हा मी' व 'हे माझें असा अभिमान ठेवतात, हे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तूही देहासारख्या आत्मभिन्न कटजावर 'हा मी' असा व त्याच्या गृहादिकावर ' ही माझी' असा मिथ्या अभिनिवश टेवलास. पण आत्मज्ञ अशा मोहात निमग्न होत नाहीत. सर्व मीच आहे, असें जाणणारा तो पदार्थाच्या अनर्थकारक विभागास ओळखीतच नाही व त्यामुळे त्याला सुख दुख-विलासमय भ्रमांत बुडण्याचा प्रसगही येत नाही. नूं या दोन स्थितीतील मध्यभागी आहेस. (म्हणजे पूर्ण अनात्मज्ञ नव्हेस व ज्ञानीही नव्हेस.) तुझे चित्त वासनाजालाने प्रस्त झाले आहे. त्यामुळे ज्याची महाव्याधि थोडीशी अवशिष्ट आहे अशा पुरुषाप्रमाणे तूं अद्यापि स्वस्थ झालेला नाहीस. तुझें ज्ञान परिपूर्ण नसल्यामुळे घर बाधावयाचा यत्न न करणाऱ्या पुरुषास वृष्टीचे जसें निवारण करता येत नाही त्याप्र- माणे तुला मनोभ्रमाचे निवारण करता येत नाही. उच पुरुष वृक्षाला जसा एकदम कवटाळतो त्याप्रमाणे तुझ्या मनात अकस्मात् जे भासते त्याचाच अभिमान तें धरते. या माया-चक्राची नाभि ( तुंबा) चित्त आहे. त्याचे आक्रमण केले पाहिजे. त्याला जिंकलें की सर्व बाधा पार नाहीशी झालीच, यास्तव, तूं आतां ऊठ व या पर्वतावरील कुंजामणे बसून अव्याकुल चित्ताने दहा वर्षे तपश्चर्या कर. म्हणजे तुला भनंत ज्ञान प्राप्त होईल. राघवा. असे बोल्न भगवान् विष्णु वातान, दीप व यमुनेचा तरंग याप्रमाणे, क्षणात अदृश्य झाला. इकडे गाधिही शरत्समयाच्या शेपर