पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६१ बृहद्योगवासिष्ठसार, स्पित काल आहे तो स्वयं परमात्माच असून तो स्वरूपातच रहातो. तो कोणाला प्रतिबंध करीत नाही व अनुमोदनही देत नाही. भगवान् काल अमूर्त आहे. त्यालाच ब्रह्म व अज म्हणतात. तो कोणाचे कधी कांही घेत व टाकीत नाही. पण वर्ष-कल्प-युगात्मक जो दुसरा लौकिक काल आहे तो सर्व उत्पम होणान्या पदार्थाचे निमित्त असल्यामुळे सूर्यादिकांच्या क्रियांवरून कल्पिला जातो. तो कल्पित कालच प्रतिबंध व अनुज्ञा यांच्या योगाने पदार्थसंघ, क्रिया, फळ इत्यादिकांची व्यवस्था करतो. तस्मात् भ्रांतचित्त पुरुष समानप्रतिभासामुळे उत्पन्न झालेल्या संभ्रमास जसे पहातात त्याचप्रमाणे भूतमडल व कीरणाम यांतील लोकानी कटंजाला पाहिले. यास्तव तूं मापल्या कर्तव्यामध्ये तत्पर राहुन सूक्ष्म बुद्धीने आत्म्याचा विचार कर आणि हे साधो, मनोमोह सोडून येथेच सुखाने रहा. मी आता जातो. राघवा, असे सांगून श्रीविष्णु गुप्त झाला व गाधि व्याकुळ मनाने तेथेच राहिला. त्यानतर त्या पर्वतावर काही महिने घालवून त्याने पुनः भगवानाची आराधना केली तेव्हा भक्तवत्सल ईश्वर त्याच्या पुढे व्यक्त शाला व पूर्वीप्रमाणेच त्याला आराधनेचे कारण विचारूं लागला. गाधी. नही साष्टाग प्रणामपूवक पूजन करून म्हटले, " भगवन् , चाडालस्थितीचे स्मरण माझ्या चित्ताला मोहित करीत आहे. यास्तव मला आत्मवस्तुचे यथार्थ ज्ञान देऊन एकाच निर्मळ कर्मात नियुक्त कर." ते ऐकून भगवान् म्हणतो-ब्राह्मणा, हे जग म्हणजे महा माया आहे. आत्मतत्त्वाच्या विस्मरणामळे भावरण उत्पन्न होऊन सर्व आश्चर्यम्पी विक्षेप सभवतात. निद्रन असंभावित पदाथांचीही जशी सभावना होते त्याप्रमाणे अज्ञानावस्थेत तू पाहिलास तशा प्रकारचा भ्रम संभवतो. या ईश्वराच्या मायेमध्ये अशा त-हेचे असम्न्य चमत्कार भरले आहेत सम संकल्प व सम काल यांच्या योगाने त्या दोन देशातील लोकांनीही मिथ्या पदार्थास सत्यासारखें पाहिले. आता चाडगळासंबधी तस्या मनास लाग. टेली चिंता कशी जाईल ते सांगतो. भूतमरलामध्ये तु जसा पाहिलाम तशाच तन्हेचा कटज नांवाचा श्वपच होता. शरीर, प्राम, गृह, स्त्री इत्यादिकासह जशा आकाराने तु त्याला पाहिले होतेस तसाच तो तथ पूर्वी रहात असे. त्याचे कुटुंब मेलें, तो कारदेशात जाऊन राजा झाला