पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग ४९. श्रीवसिष्ठ--रघुनंदना, भगवान् विष्णु निघून गेल्यावर गाधि स्वतः आपल्याशीच मोहाचा विचार करण्याकरितां, अभ्र जसें भाकाशांत भ्रमण करतें त्याप्रमाणे, भूतमंडल व कीर देश यांमध्ये वारंवार फिरला. त्याने पुनः पुनः तोच तो आपला वृत्तांत लोकांच्या तोडून ऐकला. नतर पुनरपि तो गुहेत येऊन हरीची आराधना करूं लागला. थोडक्याच अवकाशांत भगवान् त्याच्याकडे आला. कारण एकदा आराधना केल्यानेही माधव बधुतेस प्राप्त होत असतो. असो, 'गाधे, तुला आता आणखी काय पाहिजे ! तूं पुनः तपश्चर्या का करतोस?' असें तो नारायण मोठ्या प्रेमळ वाणीने विचारूं लागला असता गाधि म्हणतो--भगवन् , मी सहा महिने भूत व कीर देशांत एकसारखा फिरलों व तेथल्या निरनिराळ्या लोकांना विचारले; पण ते सर्व एकसारखाच वृत्तांत मला सागत होते. त्याच्या सांगण्यात तिळभरही अंतर पडले नाही. पण हे प्रभो, तू तर ही सर्व भूतभू मी मायेने पाहिली, असे सागत आहेस. तेव्हा आता मी काय समजू ? महात्म्यांचे वचन मोहाचा नाश करीत असते; त्याला कधीही बाढवीत नाही. श्रीभगवान-ब्राह्मणा, तुझ्याप्रमाणेच त्या लोकांच्या चित्तांत श्वपच- स्थिति काकतालीय योगाने प्रतिबिंबित झाली. त्यामुळे ते तुझा वृत्तांत जशाचा तसाच सांगत आहेत. कारण एकदा अनुभवास आलेला प्रति- भास पुनः कधी नष्ट होत नाही. कोणातरी एका श्वपचानें भूतप्रामाबाहेर भापळे घर केले होते. व तेच 'मी हे पूर्वी रचलें ' असें तूं भीतीने सम- जलास. कदाचित् एकच प्रतिभास पुष्कळांनाही होतो. मनोगति विचित्र आहे. पुष्कळ मानव एकच स्वप्न पहातात. हिरव्या गवताने भरलेल्या एकाच भूमीत रममाण होणाऱ्या अनेक हरिण बालकांप्रमाणे एकाच लीलेत पुष्कळ बालक रममाण होतात. एकाच वेळी अनेक लोक वध, बंध, पराजय, पलायन इत्यादिकांच्या द्वारा अनेक उद्यम करीत असतात. वसंतकाल फळपाकास प्रतिबंध करतो व शरत्काल त्याला ( फळांच्या पाकास ) मनुकूल आहे, असे पाहून लोक कालाला सर्व कार्याचे कारण समजतात; पण तोही भ्रमच माहे. कारण मनानेच सूर्याच्या मस्तोदया- वरून मास, ऋतु इत्यादिरूप कालाची गणना केली माहे. यास्तव तो कल्पित आहे असे म्हणण्यास काही प्रत्यवाय नाही. पण जो असंडन