पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२. मुमुक्षुव्यवहारप्रकरण-सर्ग ११. आत्म्याचे स्वरूप ओळखून व हे जग मायिक आहे, असा निश्चय करून सर्व बाह्य पदार्थ, देह, इद्रिये, मन, बुद्धि, अहंकार आणि अविद्या या सर्वाचा त्याग करावा. मरण, आपत्ति व दैन्य या दोषांचा पूर्ण विचार केल्यावर कोणाला वैराग्य होणार नाही ? पण दुःखादि यातना सहन केत्यावर विरक्त होण्यापेक्षा केवळ विवेकाने आपोआप वैराग्य उद्भवणे अधिक प्रशस्त होय रामा, धन्य आहेस. परमेश्वराच्या प्रसादा- वाचून असे विचार सुचत नाहीत. त्या नाथाच्या कृपेमुळेच तुझ्यासारख्या बालकाची शुभ बुद्धि विवेकाच्या मागे लागते. कर्माचे अनुष्ठान, मोठे तप, नियम, दान, तीर्थयात्रा, इत्यादिकाच्या योगाने पूर्व दुष्कर्माचा क्षय होतो व त्यामुळे प्राण्यास आत्मविचार सहज सुचतो. पण अनेक दुष्कर्माचा क्षय होणेच फार कठिण आहे. कारण कर्मानुष्ठानादि साधने सर्वदाच शुद्ध भावनेने होत नाहीत. कधी काम तर कधीं लोभ, कधीं दम तर कधी मत्सर; त्यास दूषित करितात ह्मणून आत्मविचाराची इच्छा होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे, असे तत्त्वज्ञ समजतात. त्या परम पदाचा साक्षात्कार जोवर झालेला नाही तोवर प्राणी या ससार-चक्रातून सुटत नाही. सकाम कर्मानुष्ठान या चक्रास एकसारखी गति देण्याच्याच उपयोगी पडते. यास्तव निष्काम कर्मयोगाने व दानादि इतर साधनाच्या योगाने अगोदर चित्तशुद्धि करून घेऊन त्या परम पदाचे व ससाराचे यथार्थ स्वरूप जाणावें. देहादि मायिक वस्तूवरील अहं-मम-भाव सोडल्या- वाचून चित्त वृत्ति आत्माभिमुख होत नाही. या ससार-सागरातून तरून जावयाचे झाल्यास ज्ञान हीच सुदृढ नौका सज्ज केली पाहिजे. आजपर्यंत जे महाजन यातून पार झाले त्या सर्वानी याच युक्तीचा आश्रय केला, व पुढच्या लोकासही तिचाच आश्रय केला पाहिजे. राघवा, मी आता तुला ती युक्ति सागतो. या जगात अनेक प्रकारची भीति आहे. उत्तम युक्तीचा आधार न धरिल्यास ती प्राण्यास व्याकुळ करून सोडते. थडी, वारा, सूर्याची उष्णता इत्यादिकाच्या योगाने होणारे दुःख व वाणीचा वेग, काम-क्रोधादि मानस वेग, जिह्वा, उदर, उपस्थ इत्यादिकाचे वेग ज्ञान- युक्तीवांचून कसे सहन होणार ? ते सर्व क्षणोक्षणी प्राण्यांस अस्वस्थ व अधीर करून सोडतात. या शरीरास थोडेसें अनिष्टही सोसत नाही. चिंता व दुःख यांवाचून प्राण्यांस दुसरे कामच नाहीसे होते. तेव्हां अशा