पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १८. व क्रमाने अनेक प्रामादिकांचे उल्लंघन करीत कौर देशास येऊन पोचला. तेथे त्याने भोळखांचे अनेक पदार्थ पाहिले व तेथील लोकांना श्वपच-राजाविषयी प्रश्न केला. तेव्हां नागरिक म्हणाले, " होय, ये आठ वर्षे श्वपच राजा होता. मंगल-हत्तीने त्याला राज्य दिले व त्यामुळे लोकां- नीही त्याच्याविषयी संशय घेतला नाही. शेवटी लोकांना जेव्हा त्याच्या हीन जातीचे ज्ञान झाले तेव्हा त्याने अग्नीत प्रवेश केला. या गोष्टीस माज बारा वर्षे झाली. " गाधि ज्याला ज्याला विचारीत असे तो तो प्रायः असेंच सागे. इतक्यांत मंदिरातून निघालेल्या आणि सैन्य व वाहने यांसह मोठ्या थाटाने जात असलेल्या विष्णुरूपी राजास त्याने पाहिले. त्याबरोबर त्याला आपल्या पूर्व राजतेचे स्मरण झाले आणि तो म्हणाला, "अहाहा, या सर्व वैभवाचा उपभोग मी काही वर्षे घेतला आहे. हत्तिणी, घोड्या, सैनिक इत्यादि हे सर्व माझ्या ओळखीचे आहे. ज्या सुदर स्त्रिया मजवर चवन्या वारीत होत्या त्याच या आता याच्यावर वारीत आहेत. माझ्या पुढे जाणाराच हा गजसघ त्याच्या पुढे जात आहे. इद्राच्या पुढे चालणा-या यम-कुबेर-वरुणासारखे हे सर्व माझेच सामत याच्या अग्रभागी चालले आहेत. माझीच अमूल्य भूषणे याने आपल्या अगावर घातली आहेत. साराश मी पूर्वी भोगलेले हे कीरदेशाचे राज्य आज मला, जणु काय दुसन्या जन्मातील आचाराप्रमाणेच, प्रत्यक्ष दिसत आहे. माझे स्वप्नच जाग्रदृत्तांताप्रमाणे खरे होऊन बसले आहे ही सर्व माया कोणी रचली आहे काही कळत नाही. हर हर! या दीर्घ मोहाने मला मूढ करून सोडलें आहे. हाय हाय, माझे मूर्ख मन वासनेने नष्ट झाले आहे. ते विस्मत भ्रमजालांनाच पहात सुटले आहे. काय करावें? अरे हो। आतां मात्र भाठवलें. भगवानानेच मला ही मोठी माया दाखविली असावी. यास्तव आता आणखीं या मोहात न पडता गिरिगुहेमध्ये बसून मी अगोदर याची उत्पत्ति व स्थिति समजून घेतो." रामभद्रा, असा विचार करून गाधि तसाच त्या नगरांतून निघाला व एका पर्वताच्या गुहेत जाऊन श्रांत सिंहाप्रमाणे बसला. त्या महात्म्याने तेथे प्रत्यहीं एक चुळकाभर पाणी पिऊन दीड वर्ष विष्णूची आराधना केली. तेव्हा भगवान् त्या ब्रामणाकडे आला व म्हणाला, "गाधे, तूं माझी श्रेष्ठ माया पाहिलीस का? मिथ्या जगज्जालचेष्टित तुझ्या अनुभवास बातें