पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/७६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५ उपशमप्रकरण-सर्ग १७. बान्याने त्या श्रोत्रियाच्या मनांत तीव्र वैराग्य उत्पन्न केले. त्याच्या घरावरील छप्पर पडून नुस्त्या भिंती उभ्या होत्या. त्यांवर गवत उगवलें होतें. मध्ये मध्ये त्यांस खिंडारें पडली होती. त्याची दारे मोडून पडलेली असल्यामुळे त्यांत वानर, कुत्रे, कोल्हे इत्यादि प्राणी स्वैर संचार करीत होते. तो म्हार- वडा म्हणजे मूर्तिमंत दारिद्य, दौर्भाग्य, दौरात्म्य व अखडित दुःस्थितिच होती. गायी, म्हशी, घोडे इत्यादिकांच्या-दांतानी फोडलेल्या-हाडाचे पाढरे तुकडे त्याच्या घराबाहेर चोहोकडे पडले होते. ते जणु काय हेच ते तुझें घर, असे म्हणून साक्षिच देत होते. गाधीने पूर्वी ज्या खापरातून खान पान केले होते ती त्याच्या दाराबाहेरच फुटून पडली होती. घरातील भिंती मोठमोठया तृष्णांसारख्या गुरांच्या वरून खाली लोंबणान्या लांब लांब शुष्क आंतड्यांनी सुशोभित दिसत होत्या. आत्मज्ञ पुरुष विचारतः शुष्क शवतुल्य झालेल्या आपल्या पूर्व देहाला जसा पहातो त्याप्रमाणे गाधि आपल्या गृहाकडे पुष्कळ वेळ पहात राहिला. नंतर तो जवळच्या कुमामात जाऊन तेथील एकास म्हणाला, "बा साधो, तूं या प्रामाचा पूर्ववृत्तांत जाणतोस काय; कारण सर्व शहाणे मागचा वृत्तांतही प्रत्यक्ष घडलेल्या वार्तेप्रमाणे जाणत असतात, असें मी सुजनान्या तोंडून ऐकले आहे. यास्तव तुला येथल्या एका हाताच्या चाडाळाचा वृत्तात ठाऊक असल्यास मला सांग. वाटसरू लोकाचा संशय दूर केल्यास मोठं पुण्य लागते." रामा, एकादा रोगी जसा अनेक वैद्यांना औषध विचारीत सुटतो त्याप्रमाणे तो ब्राह्मण तेथल्या अनेक लोकांना वारंवार असें विचारूं लागला असतां तेथील लोक म्हणाले "होय. ब्राह्मणा, तूं म्हणतोस ते खरे आहे. कटंज या नांवाचा एक दारुणाकृति चाडाळ येथें होता. पुत्र, पौत्र, सुत्, भृत्य, बंधु, भाप्त इत्यादि त्याचा परिवार फार मोठा होता. तो वृद्ध झाला असता त्याच्या सर्व कुंटुंबास कालानें गट्ट केलें, तेव्हां अतिशय उद्विग्न झालेला तो हा प्रदेश सोडून कीरपुरास गेला. तेथे भाग्यवशात् तो आठ वर्षे राजा होऊन राहिला. पण त्याचा शेवट चांगला भाग नाही. कारण तो जातीचा म्हार आहे, असे कळताच प्रजा, मंत्री प्रत्य यांनी त्याला अनर्थाप्रमाणे दर केलें । श्रेष्ठ लोकांनी त्या महापात- काचा परिहार करण्याकरिता भीत प्रवेश केला. स्वतः त्या चांडाळा-